देवळा ; (सोमनाथ जगताप) श्रीकृष्ण जयंती निमित्ताने देवळा वाजगाव रोडवरील श्रीक्षेत्र जुना मारुती मंदिरात शुक्रवार दि १२ पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .यानिमित्ताने जुना मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत .
शुक्रवार दि १९ रोजी सकाळी ९ ते ११ ह भ प . एकनाथ महाराज गोळेसर, सिन्नर यांच्या काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल .
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे ;सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ , रात्री ९ ते ११ कीर्तन यात शुक्रवारी दि १२ रोजी ह भ प निलेश महाराज , आळंदी , शनिवार दि १३ रोजी ह भ प अंजली ताई शिंदे , निफाड , रविवार दि १४ रोजी ह भ प दिनेश महाराज , सावकारवाडी , सोमवार दि १५ रोजी ह भ प तात्या महाराज ,भुईगव्हाण , मंगळवार दि १६ रोजी ह भ प तुकाराम महाराज ,जेऊरकर , बुधवार दि १७ रोजी ह भ प कीर्तन केसरी संजय नाना धोंडगे , देवळा , गुरुवार दि १८ रोजी ह भ प एकनाथ महाराज ,सिन्नर यांचे कीर्तन होणार आहे . व शुक्रवार दि १९ रोजी काल्याचे कीर्तन होऊन ,उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून सप्ताहाची सांगता होईल . या धार्मिक कार्यक्रमाचा देवळा व तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा ,असे आवाहन भजनी मंडळ ,जुना मारुती मंदिर व ग्रामस्थांनी केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम