Horoscope | हिंदू धर्म शास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीत बदल झाल्याने अनेक आपल्या आयुष्यात अनेक शुभ तसेच अशुभ योग हे तयार होत असतात. दरम्यान, ग्रह ताऱ्यांच्या बदलणाऱ्या स्थितीमुळे तयार होणाऱ्या सर्व योगांमध्ये ‘लक्ष्मी नारायण’ योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो.
लक्ष्मी नारायण योग हा शुक्र व बुध हे दोन ग्रह एकमेकांना भेटल्यावर तयार होतो. दरम्यान, येत्या (दि. २५ डिसेंबर) सोमवार रोजी शुक्र ग्रह हा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार असून, यानंतर (दि. २८ डिसेंबर) बुधवार रोजी बुध हा ग्राहदेखील वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून, ह्या वृश्चिक राशीत या दोन ग्रहांच्या संयोगामुळे ‘लक्ष्मी नारायण योग’ हा तयार होणार आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि नारायण हे या वर्षाच्या शेवटच्या काळात काही राशीच्या लोकांना धनवान बनवणार आहे. त्या राशी (Horoscope) पुढीलप्रमाणे…
तूळ राशी |Horoscope
२०२३ ह्या वर्षाच्या शेवटी, या तूळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग हा अत्यंत लाभदायी परिणाम घेऊन आला आहे. ह्या राशीच्या लोकांचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक हे दोन्ही आयुष्य खूप आनंददायीरित्या पार पडणार आहे. ह्या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये एखादा मोठा प्रोजेक्टदेखील ह्या काळात हाताळण्याची संधी मिळू शकते.
तसेच ह्या काळात तुम्हाला आणखीही काही उत्तम संधीही मिळण्याची शक्यता आहे. तसेच ह्या लोकांची आर्थिक स्थितीही या काळात पूर्वीपेक्षा सुधारेल. सोबतच ह्या राशीच्या काही लोकांना परदेशामधून काही चांगल्या संधीदेखील मिळण्याची शक्यता आहे. शुक्र व बुध यांच्यातील संयोगामुळे हा लक्ष्मी नारायण योग तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Horoscope | आजचा दिवस तुमच्याठी कसा जाईल? बघा आजचे राशीभविष्य
मेष राशी
ह्या लक्ष्मी नारायण योगाच्या काळात मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि बुध ह्या ग्रहांची युती ही अत्यंत फलदायी असणार आहे. दरम्यान, ह्या ग्रहांच्या संयोगामुळे ह्या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मी आणि नारायण यांचा विशेष कृपा वर्षाव होईल. आणि यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा आणखी सुधारेल. या काळात तुमचा मान-सन्मान हा आणखी वाढेल. तसेच, या राशीच्या लोकांची नोकरीच्या ठिकाणीही विशेष प्रगती होईल. या योगामुळे जीवनात काही सकारात्मक बदल होणार आहेत. दरम्यान, हा शुभ योगामुळे या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील.(Horoscope)
वृश्चिक राशी
लक्ष्मी नारायण योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात संपत्ती मिळेल तसेच तुमच्या ऐश्वर्यातही यामुळे भर पडेल. तसेच यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्येदेखील अनेक मोठमोठ्या संधीही मिळतील. तुमचे पद तसेच प्रतिष्ठाही याकाळात वाढण्याची शक्यता आहे. या योगामुळे तुम्हाला काही कामानिमित्त परदेश दौऱ्यावरही जाण्याचीही शक्यता आहे. तसेच तुमच्या जोडीदारासोबतचे सर्व मतभेद हे दूर होतील. हा योग तुमच्या कौटुंबिक जीवनासाठीही खूप चांगला ठरू शकतो. (Horoscope)
Horoscope Today 14 December: तुमच्या राशीनुसार असा असेल आजचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
मिथुन राशी
लक्ष्मी नारायण योग हा मिथुन राशीच्या लोकांसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आर्थिक स्वरूपाच्या काही प्रकरणांमध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे याकाळात कौतुकदेखील होईल. तसेच या काळात ह्या राशीच्या लोकांच्या जीवनात शौर्य वाढण्याची शक्यता आहे. या काळात तुमची अनेक महत्त्वाची तसेच प्रलंबित कामेदेखील पूर्ण करू शकतील. व्यावसायिकांसाठी हा योग अत्यंत उत्तम ठरणार आहे तसेच या काळात मोठा नफा मिळण्याचीदेखील शक्यता आहे.(Horoscope)
(वरील सर्व बाबी ह्या ‘द पॉइंट नाऊ’ हे माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असते, यातून आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम