Horoscope 25 January | राशीभविष्य हे ज्योतिष शास्त्र आणि पंचांगांच्या आधारे केलेले भाकीत होय. तर, ग्रहांच्या चालींनुसार, आजचा तुमचा दिवस कसा असेल ? हे जाणून घेऊयात. आज काही राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती होऊ शकते. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तर, सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य…
मेष राशी –
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार वर्गाला आज ऑफिसमध्ये जास्त काम असू शकते. त्यामुळे तुम्ही कामात व्यस्त असाल. आज तुमचे तुमच्या वडिलांशी वाद होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण असेल. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.
तुम्हालाआज तुमच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकतो. तसेच तुम्ही आज तुमच्या प्रियकरासोबत बाहेर फिरायला जाऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून एक सुंदर भेटवस्तुही मिळू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला आज पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात. आज तुमच्या जोडीदाराशीसोबत तुमचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण असतील.(Horoscope 25 January)
Horoscope 23 January | ‘या’ लोकांनी आज जीभेवर नियंत्रण ठेवावे; वाचा आजचे राशीभविष्य
वृषभ राशी –
नोकरदार वर्गाची कामाच्या ठिकाणी अडकलेली काही कामं आज पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाच्यानिमित्त बाहेर प्रवास करू शकतात. हा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल, आज त्यांना नक्कीच यश मिळेल.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आज कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकतात. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी उत्तम असेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती कराल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही. मात्र, हंगामी आजारांपासून स्वतःचा बचाव करा. नाहीतर या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
Horoscope 25 January | मिथुन राशी –
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज घरात काही विषयावर मतभेद होऊ शकतात. नोकरदार वर्गाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आज मेहनत करावी लागेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक फायदा होऊ शकतो. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुमचे आरोग्य चांगले राहील. मात्र, पोटाच्या काही समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल. म्हणूनच तुम्ही तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये सावधगिरी बाळगगावी. तुमचे वैवाहिक जीवनही चांगले असेल. मात्र, आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर तुमचे तुमच्या जोडीदारासोबत काही वाद होऊ शकतात.
कर्क राशी –
नोकरदार वर्गाने आज तुमची सर्व कामे सावधगिरीने करावीत. अन्यथा तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमचे काम बिघडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या प्रियकराला सरप्राईज देऊ शकतात. तसेच आज तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमच्या प्रेम संबंधांबद्दल बोलू शकता. आज तुम्ही काही नात्यातील काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
व्यावसायिकांना आज व्यवसायात थोडे सावध रहावे लागेल. नाहीतर तुमचे आज मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आज कोणताही करार करण्यापूर्वी विचार करूनच करावा. संबंधित सर्व कागदपत्रे ही काळजीपूर्वक वाचा, मगच त्या करारावर सही करा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज वाहन चालवताना जरा काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला शारीरिक दुखापती होऊ शकतात.(Horoscope 25 January)
सिंह राशी –
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाला आज तुमच्या ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळेल. ज्यामुळ आज तुमच वरिष्ठ अधिकारीही तुमच्या कामावर खूश होतील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुमची प्रकृती थोडीशी कमकुवत असेल. त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज तुम्ही बाहेरचे खाणे जरा टाळायला हवे. महिला आज तुमच्या मैत्रिणींसोबत खरेदीसाठी जाऊ शकतात. मात्र, आधी बजेट लक्षात घेऊनच शॉपिंग करा. तसेच आज तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या राशी –
नोकरदार वर्गाला आज तुमच्या ऑफिसमधील काही कामाच्या संदर्भात धावपळ करावी लागेल. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो किंवा तुम्ही आजारीही पडू शकतात. तरुणांना आज काही चांगली बातमीही मिळू शकते. ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरणही आनंदी असेल. लग्नाचे वातावरण असू शकते. घरात काही शुभ कार्यदेखील होऊ शकतात. यामुळे तुम्हीही आनंदी असाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांसोबत वेळ घालवू शकतात. व्यवसायिकांना तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. मात्र, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.
तूळ राशी –
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असेल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला असेल. जोडीदारासोबत आज भरपूर वेळ घालवता येईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जेवणाचे नियोजन करू शकतात. नोकरदार वर्गाला आज तुमच्या ऑफिसमध्ये कामाचा ताण असू शकतो. मात्र, तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने सर्व कामे सहज कराल.
व्यावसायिकांचा व्यवसाय आज चांगला चालेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात ग्राहकांसाठी नवीन ऑफर देऊ शकता. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात नफा मिळवू शकतात. तसेच आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतही काम करू शकतात. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.
Horoscope 21 January | ‘या’ लोकांचा होऊ शकतो विश्वासघात; वाचा आजचे राशीभविष्य
वृश्चिक राशी –
नोकरदार वर्गाचा आजचा दिवस ऑफिसमध्ये चांगला असेल. मात्र, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काम वाढवून दिले जाईल. ज्यामुळे तुम्हाला थोडा थकवाही जाणवू शकतो. व्यावसायिकांचा आजचा दिवस हा व्यवसायासाठी चांगला असेल. तुमचा व्यवसाय आज चांगला चालेल, मात्र आर्थिक स्थिती ही सामान्य राहील.
तसेच, आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबासाठी एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. तुमच्या एखाद्या जुन्या मित्रासोबतही आज तुमची भेट होऊ शकते. ज्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी जाईल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या नातेवाईकाला भेटू शकतात. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
धनु राशी –
धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत धार्मिक ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. नोकरदार वर्गाचे काम आज चांगले होईल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही तुमचे कार्य जबाबदारीपूर्वक कराल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आज त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. तसेच आज तुम्हीही वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिकांनी आज तुमच्या विरोधकांपासून थोडे सावध राहावे. तुमच्या विरुद्ध काही राजकारण होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवावा. कोणाच्या काहीही बोलण्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत भांडू नका.
मकर राशी –
नोकरदार वर्गाचे आज वरिष्ठ अधिकारी ऑफिसमध्ये कामाचे कौतुक करतील. आज ते तुमचा पगारही वाढवू शकतात. व्यावसायिकांचा व्यवसाय आज चांगला चालेल. आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी अधिक मेहनत घेतली तर तुमचा व्यवसाय खूप उंचीवर पोहोचू शकतो. घरातून बाहेर पडताना तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्ही आज तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वाढत्या वयामुळे आज त्यांची प्रकृती बिघडू शकते. आज तुमच्या जोडीदारासोबतचे परस्पर समज वाढतील. तुमच्या घरात आज आनंदाचे वातावरण असेल. आज तुम्हाला तुमचे एखादी ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
कुंभ राशी –
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाला आज तुमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने आज तुम्ही तुमची सर्व कामे सहजरित्या पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांचा व्यवसाय आज चांगला चालेल. जर तुम्ही भागीदारीत एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. (Horoscope 25 January)
आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र, आज तुम्हाला तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. जे विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याच्या तयारीत आहे. त्यांना आज पासपोर्ट किंवा व्हिसा बनवण्याच्या कामांत काही अडचणी येऊ शकतात.
मीन राशी –
नोकरदार वर्गावर आज कामाच्या ठिकाणी अधिक दबाव असेल. ज्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. व्यवसायिकांचा व्यवसाय आज चांगला चालेल. तुम्ही आज एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचाही विचार करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासह कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. ज्यामुळे त्यांना आनंद होईल.
प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही आज तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवू शकतात. तसेच जेवणाचाही प्लॅन करू शकतात. आजचा दिवस अधिक संस्मरणीय बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तुमच्या मुलांच्या शैक्षणिक करकीर्दीमुळे तुम्ही समाधानी असाल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे आणि बाहेरचे खाणे टाळावे. अन्यथा पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू होऊ शकतात.(Horoscope 25 January)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम