Horoscope 23 January | ‘या’ लोकांनी आज जीभेवर नियंत्रण ठेवावे; वाचा आजचे राशीभविष्य

0
29
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 23 January |  राशीभविष्य हे ज्योतिष शास्त्र आणि पंचांगांच्या आधारे केलेले भाकीत होय. तर, ग्रहांच्या चालींनुसार, आजचा तुमचा दिवस कसा असेल ? हे जाणून घेऊयात. आज वृषभ राशीच्या लोकांची व्यवसाय प्रगती होऊ शकतो. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तर, सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य…

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या लोकांची आज काही दिवसांची सुट्टी मंजूर होईल. यामुळे तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकतात. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. आज व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. पाकीट, चेक, एटीएम कार्ड वापरताना काळजी घ्यावी. थोडाही  निष्काळजीपणामुळे तुमचे आज नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांनी  मन एकाग्र करून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला किडनीचा त्रास होत असल्यास तुम्ही सावधगिरी बाळगावी. घरातील ज्येष्ठांचा आदर करा. मुलांच्या निमित्ताने तुमचे मन आज आनंदी राहील.(Horoscope 23 January)

वृषभ राशी –

नोकरदार वर्गाने, कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला बॉसच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. मात्र, तुमचे सहकारी आज तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. तरुणांनी आज तुमच्या मनात तुमच्या भविष्याबद्दल काही नकारात्मक विचार आणू नयेत. ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो. असे लोक तुमच्या आजूबाजूला असतील. त्यामुळे तुमचे भांडण होऊ शकते.

आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, तुम्हाला जर काही पोटाशी संबंधित आजार असेल तर तुम्ही जास्त मिरची मसाल्यांचे खाणे टाळले पाहिजे. तसेच बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत. व्यवसायिकांना व्यवसायात आज नुकसानही होणार नाही किंवा फारसा नफाही होण्याची शक्यता नाही. मात्र, तुम्ही कर्मचार्‍यांशी चांगली वागणूक ठेवायला हवी. आज तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता.

Horoscope 21 January | ‘या’ लोकांचा होऊ शकतो विश्वासघात; वाचा आजचे राशीभविष्य

मिथुन राशी –

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाने, आज तुमच्या ऑफिसमध्ये टीमसोबत काम करत असल्यास सहकाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नका.  तुमचे कर्मचारी आज तुमच्यावर पक्षपातीपणाचा आरोपदेखील करू शकतात. तरुणांनी मन शांत ठेवण्यासाठी हनुमानाची पूजा करावी. तुम्ही आज सिंदूर अर्पण करून हनुमानाची पूजा करू शकता.

आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, तुम्हाला आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे वजन जास्त प्रमाणात वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवावा. व्यवसायिकांना तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवनवीन उपायांचा अवलंब केला पाहिजे. तसेच तुमच्या उत्पादनांची जाहिरात केली पाहिजे. मुलाकडून करिअरबद्दल आनंदाची बातमी येऊ शकते. (Horoscope 23 January)

कर्क राशी –

नोकरदार वर्गाला आज कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागणार नाही. उलट योग्य नियोजन करून तुमचे काम पुढे नेण्याची गरज आहे. तरुणांनी आज कोणतेही काम करताना ते घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊनच सुरू करावे. मात्र, तुमच्या कुटुंबात कलह होत असल्यास आज त्या समस्यांवर तोडगा काढावा.

आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, काही हवामान बदलांमुळे तुम्हाला आज पाठदुखीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज तुम्ही जास्त वाकून काम करणे टाळावे. व्यावसायिकांना एखादा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुमची योजना पुढे ढकलावी. या काळात जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला. तर, भविष्यात विरोधकांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुम्ही मुलाच्या करिअरबद्दल तुम्ही चिंतेत असाल.

Horoscope 23 January | सिंह राशी –

नोकरदार वर्गाने आज तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. तसेच उत्पन्नानुसार पैसे खर्च करावेत. तरुणांनी आज जास्त ताण घेऊ नये. तणावामुळे तुमची कामे बिघडू शकतात. आज तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवा आणि त्यांच्या कामकडेही लक्ष असू द्या. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, तुमचे आरोग्य आज सामान्य असेल. मात्र, आज तुम्ही आग, पाणी आणि वीज यापासून दूर राहावे. दूध, दही, तसेच तुप इत्यादिचा व्यवसाय करणाऱ्यांना आज मोठ्या कंपनीची ऑफर येऊ शकते.  ज्यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल, तसेच तो तुमची खूप काळजी घेईल.(Horoscope 23 January)

कन्या राशी –

नोकरदार वर्गाने आज तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणतेही काम करण्याआधी मार्गदर्शन घ्यावे. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. तरुणांनी आज आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना दान करावे. त्यांच्या आशीर्वादामुळेच तुमची काही प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. पुत्रप्राप्तीची जोडप्यांना आज चांगली बातमी मिळू शकते.

आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, आज तुम्ही वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रासही होऊ शकतो. फायनान्सचा व्यवसाय करणाऱ्यांना आज एखादी मोठी डील मिळू शकते. त्यामुळे तुम्ही मोठ्या कंत्राटदाराशी करार करा. आज तुमचे मन काही धार्मिक कार्यात व्यस्त राहील.

तूळ राशी –

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा आत्मविश्वासाने भरलेला असेल. तरुणांनी जर तुमच्या मित्राकडून काही पैसे उधार घेतलेले असल्यास ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर, तुमच्या मैत्रीत दुरावा होऊ शकतो. घरचे काही काम करायचे असल्यास, आजचा दिवस शुभ आहे.

तुम्ही हे काम लवकरात लवकर सुरू करू शकता. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास खोकला, सर्दी किंवा इतर समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यावसायिकांना तुमच्या व्यवसायात आर्थिक नफा मिळवायचा असल्यास व्यवसायासाठी खूप मेहनत करावी लागेल. तरच तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुमचा व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते.  (Horoscope 23 January)

Horoscope 19 January | ‘या’ लोकांनी आज जोडीदारावर विश्वास ठेवावा; वाचा आजचे राशीभविष्य

वृश्चिक राशी –

जनोकरदार वर्गाचे लोक आज तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित लोकांना सहकाऱ्यांसोबत बोलताना विचार करून बोलावे. अन्यथा या गोष्टींचे वाईट परिणामही होऊ शकतात. तरुणांना आजपासून अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. अन्यथा भविष्यात ते महागात पडू शकते. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकतात.

आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, हवामान बदलांमुळे तुम्हाला खोकला, सर्दी इत्यादींचा त्रास होऊ शकतो. व्यावसायिकांनी आज तुमच्या ग्राहकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. कारण ग्राहकांच्या वेशात आलेला एखादा व्यक्ती तुमची फसवणूक करू शकतो. त्यामुळे थोडे सावध राहावे. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

धनु राशी –

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाला आज तुमच्या ऑफिसमध्ये कामाचा ताण खूप जास्त असू शकतो. तरुणांना आज त्यांच्या कलेच्या क्षेत्राशी संबंधित एखादी संधी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत वेळ घालवू शकतात. आज तुम्ही भगवान हनुमानाची पूजा करावी. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, आपण आरोग्याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांनी तुमचा व्यवसाय वाढवायचा असल्यास व्यवसायाशी संबंधित काही नवीन उत्पादने तुमच्या व्यवसायात समाविष्ट करावीत. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.(Horoscope 23 January)

मकर राशी –

नोकरदार वर्गाला आज तुमच्या ऑफिसचे वातावरण खूप आनंददायी असेल. कामाच्या ठिकाणी आज एखादे सेलिब्रेशनही असू शकते. विद्यार्थी संभ्रमात असतील तर त्यांनी कुठलाही विलंब न करता त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, मुलांच्या आरोग्याशी संबंधित काही अडचण असेल तर निष्काळजीपणा दाखवू नका. शक्य तितक्या लवकर त्यांच्यावर उपचार करा. तुम्ही तुमच्या हातांची योग्य काळजी घ्यावी. थंडीमुळे तुमच्या हातांना काही इन्फेक्शन होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर सजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला असेल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाचा आजचा दिवस हा खूप उर्जेने भरलेला असेल. तुम्ही त्याचा योग्य तो वापर करून दिलेली सर्व कामे ही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाबाबत गाफील राहू नये. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचेही पालन करायला हवे. तेलाचा व्यवसाय करणाऱ्यांना आज काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुलांच्या बाबतीत एखादी बातमी कळल्यामुळे तुम्ही आज चिंताग्रस्त असू शकतात. यामुळे तुम्ही काही काळ अस्वस्थ असाल.

मीन राशी –

नोकरदार वर्गाने, नवीन तंत्रज्ञानाद्वारे काम केल्यास त्यांची कामे लवकर पूर्ण होतील. तरुणांनी त्यांच्या करिअरचे नियोजन करावे. आज तुम्ही बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. चुकीच्या बोलण्यामुळे तुमचे काही काम बिघडू शकते.  आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नवनवीन शारीरिक क्रिया करत राहाव्यात. एखाद्या नवीन कार्यात तुम्ही स्वतःला झोकून दिल्यामुळे आज तुमचे आरोग्य तंदुरुस्त असेल. व्यावसायिकांना एखादा   नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास हा व्यवसाय सुरू करण्याआधी तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा. अन्यथा, तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितष्याबद्दल चिंताग्रस्त असाल.(Horoscope 23 January)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here