onion news | विंचूरची कांदा लिलावात ऐतिहासिक नोंद; लासलगाव बाजार समितीला टाकले मागे

0
23

onion news |  कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र आवारातील कांद्याचे लिलाव हे ऑगस्टपासून वेगवेगळ्या कारणांमुळे सतत बंद ठेवले जात आहेत. यामुळे कांद्याच्या लिलावावर याचा परिणाम झाला आहे.

लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीने चार महिन्यांतच कांदा लिलावात आघाडी घेत लासलगाव मुख्य कांदा आवारापेक्षा १ लाख १४ हजार क्विंटल जास्त कांद्याचे लिलाव केलेत.

विंचूर उपबाजार समितीने लासलगावच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवाराला मागे टाकत कांदा लिलावात ऐतिहासिक नोंद केलेली आहे. लासलगाव येथे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व १९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ११२ दिवसांत दीपावलीत साप्ताहिक सुट्ट्या तसेच व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे ४७ दिवस कांद्याचे लिलाव हे बंद होते.

६ लाख ९७ हजार क्विंटल इतक्या कांद्याची आवक झाली आहे, तर विंचूर येथे याच दिवसांत कांदा व्यापारी, कामगारांनी कांदा लिलावात सातत्य ठेवल्याने ८ लाख ११ हजार क्विंटल इतक्या कांद्याची आवक झाली आहे.

दरम्यान, येणाऱ्या दिवसात अधिक कांद्याचे लिलाव करुन ही आघाडी कायम ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले आहे.

देवळा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजारात कांद्याची आवक

-ऑगस्ट : तीन लाख ११ हजार क्विंटल

-सप्टेंबर : एक लाख १४ हजार क्विंटल

-ऑक्टोबर : दोन लाख ४० हजार क्विंटल

-७ नोव्हेंबरपर्यंत : ३२ हजार क्विंटल

विंचूर उपबाजारात झालेली कांद्याची आवक

-ऑगस्ट : तीन लाख २२ हजार क्विंटल

-सप्टेंबर : एक लाख ६५ हजार क्विंटल

-ऑक्टोबर : दोन लाख ४९ हजार क्विंटल

१३ नोव्हेंबरपर्यंत : ७५ हजार क्विंटल

Maharashtra | राज्याच्या काही भागात आज अवकाळी पाऊस; शेतकरी चिंचेत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here