Hemant Godse | छत्रपती सेनेचा गोडसेंना पाठिंबा; पत्रक काढत कारणही सांगितले..?

0
27
Hemant Godse
Hemant Godse

Hemant Godse |  हिंदुस्थानाला महाशक्ती बनवण्यासाठी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात व महायुती बळकट करण्यासाठी छत्रपती सेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रक छत्रपती सेनेतर्फे काढण्यात आले आहे. यात महायुतीचे उमेदवार गोडसे यांना पाठिंबा का दिला..? याबाबत छत्रपती सेनेने स्पष्टीकरण दिले असून, यात सेनेतर्फे गेल्या ६ वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ स्मारकास हेमंत गोडसे व अजय बोरस्ते यांनी निधी उपलब्ध करून दिला व स्मारक उभारणी साठी पाठपुरावा केला.

Hemant Godse | महारोजगार व उद्योजकता मेळावे

विविध समाजाच्या महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना व्यावसायिक कर्ज तसेच महिला बचतगट, होकर्स धारक यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सुमारे १०० कोटींचे कर्ज मिळवून दिले.

Nashik Loksabha | नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर

आण्णासाहेब पाटील महामंडळास निधी दिला

कोविड काळात आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात निधी उपलब्ध होत नव्हता. त्यावेळी मराठा समाजातील नव उद्योजक व व्यावसायिक यांच्या कर्जाचा व्याज परतावा थकला होता. हेमंत गोडसेंनी छत्रपती सेनेच्या मागणीनुसार शासन दरबारी पाठपुरावा करून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागस विकास महामंडळास निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नवउद्योजक व व्यावसायिकांना व्याज परतावा मिळवून दिला ज्याचा उद्योगात झाला.

सारथीच्या विभागीय कार्यालयासाठी प्रयत्न 

सारथी संस्थेचे विभागीय कार्यालय नाशिकमध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न हेमंत गोडसे यांनी केले. त्यासाठी अत्याआधुनिक इमारत बांधून ट्रेनिंग निवासी ट्रेनिंग सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. ह्या सारथी संस्थेमार्फत बऱ्याच सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी मोठ्या स्वरूपात मदत होणार आहे व मेक इन इंडिया व मेड इन इंडिया यामुळे खऱ्या अर्थाने अंमलात आणली जाणार आहे.

Hemant Godse | मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि कर्ज ; बघा गोडसेंची संपत्ती किती..?

छत्रपती सेना महाराष्ट्र राज्यतर्फे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पत्र देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, निलेश शेलार, राजेश पवार, डॉ शाम थवील, राज गुंजाळ, विश्वदीप शिंदे, कुणाल शेलार, सनी निमसे, सागर विसे, सचिन देवगिरे, अविनाश पाठील, वैभव कसार, जितू अहिरे, गणेश पगार, वैभव बोरसे, आसिफ शेख, जावेद शेख, राजाभाऊ ठाकरे, महेंद्र दळवी, धीरज खोळंबे, सागर मोरे, मुज्जू शेख, भूषण तनपूरे सचिन जाधव आदींसह छत्रपती सेनेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here