द पॉइंट नाऊ
गुजरात राज्यातील पाटीदार समाजातील नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर . काँग्रेसमधील शीर्ष नेते तसेच गुजरातमधील स्थानिक नेत्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी हा निर्णय घेतला होता. दरम्यान, पटेल यांची आगामी काळात राजकीय भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना ते येत्या गुरुवारी म्हणजेच २ जून रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. तशी माहिती भाजपा प्रवक्त्याने दिली आहे.
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानं सोडल्यानंतर पटेल यांनी काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पद्धत यावर नाराजी व्यक्त केल हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पटेल मागील दोन महिन्यांपासून भाजपाच्या संपर्कात होते. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम