Gold Silver Rate | नव वर्षाच्या सुरुवातीला असे आहेत सोने-चांदीचे दर

0
25
Gold Silver Rate Today
Gold Rate Today

Gold Silver Rate | मावळत्या वर्षात सोने-चांदीचे दर हे गगनाला भिडलेले होते. २०२३ मध्ये सोने चांदीच्या दरांनी आगेकूच कायम ठेवल्याने किंमतींचा आलेख हा चढताच राहिला. मात्र, दिवाळी आणि वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत दरांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. ही संधी साधत ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली. त्या गुंतवणूकदारांचे भाग्य हे चांगलेच उजळले. (Gold Silver Rate)

दरम्यान, गेल्या वर्षाचा विचार करता या गुंतवणूकदारांना एका वर्षातच सोन्याने प्रति १० ग्रॅममागे ८,७७९ रुपयांचा तर, चांदीने प्रति किलोमागे ७,२०० रुपयांचा नफा मिळवून दिला आहे. मात्र, सामान्य ग्राहकांना या वाढलेल्या किंमतींची मोठी झळ बसली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार रोजी पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात सोने-चांदीच्या वाढत्या दरांना ब्रेक लागला. त्यामुळे आता नव वर्षात सोने-चांदीचे दर हे आटोक्यात रहावेत, हीच इच्छा सामान्य ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. (Gold Silver Rate)

Gold Silver Rate | वर्षाअखेरीस असे आहेत सोने चांदीचे दर

नवीन वर्षाच्या सुरुवातीला असे आहेत दर..?

सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात ७०० रुपयांनी सोन्याच्या किंमतींमध्ये दरवाढ झाली. तसेच, त्यात शेवटच्या दिवशी ४०० रुपये इतकी घसरण झाली आहे. नवीन वर्षामध्ये सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झालेली नाही. दरम्यान गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे  ५८,७०० रुपये असे आहेत. तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,९७० रुपये असे आहेत.

चांदीत घसरण

गेल्या वर्षातील शेवटच्या आठवड्यात चांदीच्या किंमतींमध्ये तब्बल १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, २९ डिसेंबर रोजी चांदीचे दरांमध्ये १,२०० रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, त्यानंतर दर हे अपडेट झाले नाहीत. दरम्यान गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो इतक्या चांदीचे दर हे ७८,६०० रुपये असे आहेत. गुंतवणूकदारांना गेल्या वर्षात चांदीने भरघोस रिटर्न दिलेला असून,  प्रति एक किलोच्या मागे गुंतवणूकदारांना ७,२०० रुपयांचा नफा मिळाला आहे.

Gold Rate Today | सोन्यापेक्षा चांदी पुढे; असे आहेत आजचे दर

Gold Silver Rate | असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव..?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज प्रति कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत. दरम्यान, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,३५२ रुपये असे आहेत. तसेच २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम ६३,०९८ रुपये असे आहेत. तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५८,०३० रुपये झाले आहे. १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमती या  ४७,५१४ रुपये असून, १४ कॅरेट सोने हे ३७,०६१ रुपयांवर पोहचले आहे. दरम्यान, एक किलो चांदीचे आजचे दर हे  ७३,७०५ रुपये झाले आहेत. (Gold Silver Rate)

(टीप – वरील दर हे सूचक असून, ‘द पॉइंट नाऊ’ याद्वारे कुठलाही दावा करत नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.) 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here