Gold silver rate | आधी ऐन दिवाळीच्या काळात सोने-चांदीच्या किंमती वाढल्या होत्या. त्यांनतर आता ऐन लग्नसराईत ह्या सोने-चांदीच्या दरांत दरवाढीचे सत्र हे सुरूच होते. आणि आधीचा मे महिन्यातला विक्रम मोडत ह्या दरांनी रोज नव नवीन विक्रम रचले जात होते.
दरम्यान, ऐन लग्नसराईत आता ह्या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मोठी दरवाढ ही सुरू झाली होती. तर, ह्या महिन्यात ४ डिसेंबर रोजी सोन्याने ऐतिहासिक उच्चांकी दर देखील गाठला होता. या सोबतच चांदीनेही विक्रमी दर गाठला होता. दरम्यान, ह्या महिन्यात ९ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरांत ६५० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६२,३०० रुपयांवर पोहोचले होते. तर, चांदीच्या दरांतही ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ७४,००० रुपये प्रतिकिलोवर आली होती. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याचे दर हे दोन हजारांवर तर चांदीचे दर हे तब्बल ४००० रुपयांनी खाली घसरले आहेत.
Gold scheme | सरकार देतंय सोने गुंतवणुकीची गोल्डन ऑफर
असे आहेत आजचे दर..?
२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज रुपये ६१,७१० अशी असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ही ६१,८४० रुपयांवर बंद झाली होती. बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, चांदी ही आज ७२,२३० रुपये प्रति किलो ह्या दराने विकली जात आहे. दरम्यान, मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७२,४५० रुपये प्रतिकिलो अशी होती.
Gold Rate | ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोने 1300 तर चांदीही झाली स्वस्त
कोठे कसे आहेत दर..?
बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार, राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत. दरम्यान, आर्थिक राजधणी असलेल्या मुंबईत २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज ५६,४६७ रुपये अशी आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६१,६०० अशी आहे. तसेच पुण्यात हे २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५६,४६७ वर पोहोचला आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६१,६०० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे भाव हे ५६,४६७ आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव हे ६१,६०० रुपये असा आहे. तर, नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमती ह्या ५६,४६७ इतक्या आहेत. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६१,६०० रुपये असा आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम