दिंडोरी: ग्लोबल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आज सर्व शिक्षकांना सुखद धक्का देत इयत्ता ९ वी व १०वी च्या विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच शाळेची सर्व सुत्रे त्यांच्या हातात घेतली होती, अगदी उत्तम रितीने नियोजन केले तसेच लहान शिशु ते इयत्ता ९वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षक बनून शिकविले. शिक्षकांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री सारंग आणि नयना आंधळे यांनी केले होते. नृत्य, नाटीका इ.कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. ग्लोबल स्कूल मधील सर्वच शिक्षक या प्रसंगी खूप आनंदी व भावूक झाले होते. या सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख दर्शन वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.
संचालक श्री. केन व मुख्याध्यापिका विनया मॅम यांनी सर्व १० वी च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचा समारोप सिमरन यादव या विद्यार्थीनी ने केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम