Manoj Jarange Patil | पवार साहेबच म्हणाले होते, मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे.? – गिरीश महाजन

0
56
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : सगे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र, राज्य सरकारने पाठवलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची समजूत काढली आणि त्यानंतर राज्य सरकारला पुन्हा एक महिन्याचा वेल देण्यात आला असून, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तर, काल जरांगे यांनी आपण विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. स्वतः निवडणुकीत उभे राहणार नाही. पण मराठा समाजाचा उमेदवार देणार आणि गरज पडली तर दलित, वंचित यांनाही सोबत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil)

Manoj Jarange Patil | जरांगेंचं समाधानच होत नसेल तर आम्ही काय करु..?

दरम्यान, याबाबत मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य सध्या चर्चेत असून, यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. “मनोज जरांगे पाटील यांचं जर समाधानच होत नसेल तर आता आम्ही तरी काय करु..? सगेसोयऱ्यांचं (maratha aarakshan sage soyare) आरक्षण हे कोर्टात टिकाणारं नाही, असे विधान राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन (girish mahajan)यांनी केले आहे.

सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, असे आरक्षण कोर्टात टिकणारच नाही. त्यामुळे असं आरक्षण देता येणार नाही, असं मला वाटतंय. पण त्यामध्ये जर काही करता येत असेल तर ते आम्ही करु. आम्ही येथे कुणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही. आम्हीच आरक्षण दिले असल्याचेही मंत्री महाजन यावेळी म्हणाले. (Manoj Jarange Patil)

Manoj Jarange Patil | जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषण मागे घेण्याची फडणवीसांची विनंती

पवार साहेबच म्हणाले होते, मराठा समाजाला आरक्षण देण्याची काय गरज आहे ?

गेल्या वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषण व आंदोलन केलं. त्यामध्ये याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरले का ? असा प्रश्न महाजन यांना पत्रकाराने केला असता, यावर गिरीश महाजन म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी  जे काही शक्य आहे ते सर्व शासनाने केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं.

५० वर्षात कुणी प्रयत्न केला का..? शरद पवार साहेब तर तेव्हा म्हणाले होते की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच काय गरज आहे ? आणि आता तेच आमच्यावर टीका करताय. त्यावेळी उच्च न्यायालयातही आम्ही आरक्षण टिकवलं. पण त्यानंतर आमचं सरकार गेलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार हे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. आताही आम्ही १० टक्के आरक्षण परित केलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असून, काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत, असा टोलाही यावेळी महाजन यांनी विरोधकांना लगावला.

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवालीतील ग्रामस्थांचाच विरोध


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here