Nashik news | मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण

0
27

प्रतिनिधी – नाशिक | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तसेच  महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी मधील नॉन कीमिलेयर गटातील युवक आणि युवतींसाठी मोफत असणार आहे. ही योजना मराठा समाजातील युवक युवतींसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील आणि कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल.

Weather update | हिवाळा नाही पावसाळा; वादळ वाऱ्यासह तूफान पावसाची शक्यता

स्पोकन इंग्लिश, आयटी स्कील, अकाउंटिंग स्कील, बँकिंग स्कील, वेब डिझाइन, फोटोशॉप हार्डवेअर, नेटवर्किंग प्रोग्राम यातील चार मॉड्यूल विद्यार्थ्यांना निवडता येणार आहेत. मराठा समाजातील ज्या युवक- युवतींना प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल,

त्यांनी नाशिक शहरातील अशोकस्तंभ परिसरातील घनकर लेन येथील अस्मी कॉम्प्युटरचे संचालक- किरण उशीर (९३७१५२७३४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमकेसीएलचे नाशिक विभाग प्रमुख- सुभाष पाटील, जिल्हा समनवयक- मकरंद बेलगावकर यांनी केले आहे.

MPSC 2023 | सरकारी खात्यात ३०३ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here