Deola | खर्डे येथील साखळी उपोषणाला माजी आमदार शिरिषकुमार कोतवालांची भेट…

0
11

Deola |  देवळ्यातील खर्डे येथे मंगळवारी (दि. ३१) पासून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, उपोषणस्थळी आज मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी भेट दिली. यावेळी कोतवाल त्यांच्या समवेत मविप्र समजाचे तालुका संचालक विजय पगार, गोविंद पगार हे उपस्थित होते .
दरम्यान, यावेळी कोतवाल यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी वेळकाढू पणाचे धोरण अवलंबित आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असतांना हे सत्ताधारी बघ्याची भूमिका घेत असून, सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल. हे राज्यसरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले असून, जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत घरी बसविल्या शिवाय राहणार नाही.

सरकारने उपोषण, आंदोलनकर्त्यांचा अंत न पहाता तात्काळ मार्ग काढून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला यापेक्षाही मोठ्या रोषाला बळी पडावे लागेल. असा इशारा यावेळी कोतवाल यांनी दिला. जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने खर्डे येथे  गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

Crime News | बेवड्यांनो जरा सुधरा रे…! ; अपघात झाला तरी बाटल्या पळवता

गुरुवारी उपोषणस्थळी पंचक्रोशीतील कणकापूर येथील अॅड. तुषार शिंदे , उपसरपंच जगदीश शिंदे ,काशिनाथ महाराज शिंदे, दादाजी शिंदे, गोविंद बर्वे, बापू शिंदे, विजय जैन, साहेबराव सावकार, भाऊसाहेब शिंदे, संजू बर्वे, दादा गोसावी, सोनू शिंदे, योगेश शिंदे, संजय शिंदे, आबा सावकार, खंडू बच्छाव, रमेश सावकार, उत्तम शिंदे, अशोक शिंदे, कडू महादू, बंटी बर्वे , शिवसेनेचे सुनील शिंदे आदींनी भेट देऊन आपला सहभाग नोंदवला .
यावेळी खर्डे गावचे उपसरपंच बापू जाधव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, संदीप पवार, माधव ठोंबरे, सचिन गांगुर्डे, कारभारी जाधव, प्रहारचे कृष्णा जाधव, युवा जिल्हाध्यक्ष बापू देवरे आदी मान्यवर उपस्थित होते .

Deola | तालुक्याच्या दुष्काळ यादीत समावेश करा; ‘ऊबाठा’ आक्रमक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here