नाशिक : राज्यात मान्सून दाखल झाला आहे मात्र, राज्याच्या काही भागात पाऊसच नसल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी कंबर कसून तयार आहे.
राज्यात आत्तापर्यंत केवळ १ टक्काच पेरणी झाली आहे. १८ जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ७५ मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. पावसाने ओढ दिल्यानं बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून, पाऊस लांबल्यानं जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
हे सुद्धा वाचा :
नाशिकच्या प्रवाशांनी एसटी महामंडळाला दिला झटका, ८० रुपयांचे आता ८ हजार द्यावे लागणार
एकीकडे हवामान खात्याकडून पाऊस पडण्याचा अंदाज भाकित ठरत आहे, तर दुसरीकडे राज्यभरात बळीराजा पावसाची चातक पक्षासारखी वाट पहात आहे.
शेतकरी १ ते २ मैल अंतरावरून पाणी घेऊन जात पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्नकरीतआहेत.बळीराजा वर पेरणीचे संकट ओढावले आहे.शेतकरी हा अर्थ व्यवस्थेचा कणा समजला जातो. पण त्याचाच कणा मोडला गेला असून परिस्थितीशी जुळवून घेऊन जीवन जगत आहे.
पण, यंदा जून महिन्यात 90 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले असून पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही.
धक्कादायक! 10 वर्षीय मुलाने केली आईची कुऱ्हाडीने वार करुन हत्या
Weather Updates: Heavy Rains Likely in Konkan, Central Maha from June 18, Says IMD
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम