कृषी प्रतिनिधी : कृषी प्रधान देशात शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यात आता धक्कादायक बातमी समोर येत असून रासायनीक खते पुन्हा महागणार असल्याचे सूतोवाच केंद्राकडून मिळत आहेत.
शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसलेला आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांची पेरणीच्या दृष्टीने लगबग सुरू होणार. त्याचबरोबर लागणाऱ्या (Fertilizers Buying) खतांसाठी देखील खरेदी करण्यात येईल . मात्र यंदा Fertilizer prices वाढ झालेली आहे. सर्वच कंपन्यांच्या खतांच्या दरामध्ये सुमारे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. (Potash price) पोट्याश खतांच्या दरामध्ये सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी 930 रुपयांना मिळत होते ते यंदा मात्र 1700 रुपयांना मिळणार आहे. अशी माहिती मिळत आहे.
खते शेतीसाठी महत्वाचे असून DAP ची एक गोणी मागील वर्षी 1200 रुपयांना मिळत होती तर ती गोणी यंदा 1350 रुपयांना मिळत आहे. यंदा सर्वच कंपन्या डीएपीची एक गोणी 1350 रुपयांना विकणार असल्याची माहिती आहे. याचा अर्थ DAP Fertilizer च्या दरात गोणीमागे 150 रुपयांनी वाढ झाली आहे. तर सगळ्या खत उत्पादक कंपन्यांचा 10.26.26 हा ग्रेड यंदा 1470 रुपयांना मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मागील वर्षी हाच ग्रेड 1250 रुपयांच्या जवळपास होता. म्हणजेच तब्बल दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे. पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.
मार्केटमध्ये खतांचा तुटवडा आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी मार्केटमधील काही खत विक्रेत्यांना संपर्क केला असता त्यांच्यामते सध्यातरी मार्केटमध्ये खतांचा तुटवडा नाही मात्र पाऊस पडल्यानंतर खतांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. पेरणीच्या तोंडावर साठा उपलब्ध करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या खत विक्रेत्या कंपनीचा साठा उपलब्ध असेल अशा कंपनीच्या खतांची खरेदी केली तर ही समस्या उद्भवणार नाही आणि खतांचा तुटवडा देखील भासणार नाही. असे देखील अनेक विक्रेत्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28 मे रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित ‘सहकार से समृद्धी’ या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी खतांच्या किमतीविषयी बोलताना ते म्हणाले, “भारत मोठ्या प्रमाणावर खतांची आयात करत असतो. जवळपास एक चतुर्थांश भाग आपण आयात करतो. पोटॅश आणि फॉस्फेट खतं तर आपल्याला 100% विदेशातून आयात करावी लागतात. कोरोना लॉकडाऊनमुळे खतांच्या किंमतीत वाढ झाली. त्यातच युक्रेन-रशिया युद्धामुळे खतांची बाजारातील उपलब्धता कमी झाली. यामुळे खतांचे भाव कैकपटीनं वाढले. भारत विदेशातून युरियाची एक बॅग साडे तीन हजारांना खरेदी करतो. पण आपल्या देशात गावागावांत ती केवळ 300 रुपयांना उपलब्ध करून देतो. युरियाच्या एका बॅगवर सरकार तीन हजारांपेक्षा जास्त खर्च उचलतं. डीएपीच्या 50 किलोच्या एका बॅगवर सरकार 2500 रुपयांना अनुदान देतं. गेल्यावर्षी खतांवर 1 लाख 60 हजार कोटींचं रुपयांचं अनुदान केंद्र सरकारनं दिलं. यंदा हे अनुदान 2 लाख कोटींपेक्षा जास्त आहे,” असंही मोदी म्हणाले.
खत खरेदी करताना ही घ्या काळजी….
खत खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टींची खबरदारी बाळगणं आवश्यक असतं. खत खरेदी करताना प्रमुख 4 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, खत खरेदी करताना तुम्ही ज्या दुकानात जाता, त्या दुकान मालकाकडे खते विक्रीचा परवाना आहे की नाही हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे. दुकानात दर्शनी भागात तो परवाना लावलेला असतो. रासायनिक खतांची विक्री ई-पॉश मशीनमधून करण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यासाठी शेतकऱ्याला स्वत:चं आधार कार्ड सोबत बाळगणं अनिवार्य आहे. ज्यावेळेस तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडे जाता, त्यावेळी खरेदीनंतर त्यांच्याकडून तुम्हाला पावती दिली जाते. त्या पावतीनंतर संबंधिताचा परवाना क्रमांक नमूद केलेला असतो. ज्यावेळेस पॉश मशिनमधून प्रिंट काढली जाते, त्यावेळेस त्यावर किती रुपयाला खत मिळालं त्या एमआरपीचा उल्लेख केलेला असतो. त्यामुळे खताची बॅग आणि आणि ई-पॉश मशिनची जी प्रिंट आहे, तिच्यावरचा रेट एकच असला पाहिजे. यात जर कुणी दुकानदार जास्त दरानं विक्री करत असेल तर याबाबतची तक्रार तुम्ही कृषी विभागाकडे करता येते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम