नाफेडच्या कांदा खरेदीत शेतकऱ्यांची लूटमार ? ; सखोल चौकशी करा प्रहारची मागणी

0
39
कांद्याच्या भावात सुधारणा व्हावी आदी मागण्यांसाठी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देतांना प्रहारचे भाऊसाहेब मोरे,बापू देवरे ,शशिकांत पवार,संदीप पवार,माधव ठोंबरे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; महाराष्ट्रातील प्रमुख पिक असलेल्या कांद्याच्या बाजार भावात दिवसेंदिवस वाढतच असलेली घसरण व नाफेडच्या खरेदीतून चालू असलेली शेतकऱ्यांची लूटमार याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने (दि २ ) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले .

कांद्याच्या भावात सुधारणा व्हावी आदी मागण्यांसाठी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देतांना प्रहारचे भाऊसाहेब मोरे,बापू देवरे ,शशिकांत पवार,संदीप पवार,माधव ठोंबरे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा की, सद्या कांद्याच्या भावात होत असलेली घसरण शेतकऱ्यांना भेडसावत असून ,त्यात नाफेड कडून शेतकऱ्यांची सुरू असलेली लूटमार या दोन मुद्यावर सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा मिळायला हवा . कांदा पिकाचा उत्पादन खर्च २० ते २२ रुपये प्रति किलो येतो . बाजारात खरेदी साठी शासनाच्या वतीने ९ ,१०,व ११ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी होत आहे .

यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने याची दखल घेऊन कांदा उत्पादन खर्च आणि बाजार भाव यातील तफावत अनुदान स्वरूपात मिळावी , नाफेड ची खरेदी आणि शेतकल्याला मिळालेला भाव याची सखोल चौकशी करावी , शेतकयांना प्रलंबित अनुदान त्वरित अदा करावे , पिक विमाची रक्कम पंचनाम्यानुसार अदा करावी, बी – बियाण्याच्या तक्रारी साठी टोल फ्री क्रमांक द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत .निवेदनावर प्रहारचे बापु देवरे , शशिकांत पवार , भाऊसाहेब मोरे ,विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार ,माधव ठोंबरे ,हितेंद्र आहेर,नितीन अहिरे,मनोज सोनवणे ,तुषार जाधव,मुन्ना जाधव ,समाधान देवरे,भास्कर देवरे ,नानाजी गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here