कृषी प्रतिनिधी : नाशिक जिल्हा कांदा उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्यांना निवडून दिले ते मात्र हातावर हात ठेवून गप्प बसलेत हे अतिशय दुर्दैवी असून शेतकऱ्यांना वाली नसल्याचे चित्र आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत डॉ भारती पवारांना शेतकऱ्यांनी डोक्यावर घेत भरघोस मतांनी निवडून दिले मात्र कांदा हजाराच्या आत जात असताना त्यांनी आपली भूमिका देखील मांडली नसल्याने शेतकरी संतापले आहे. तसेच चित्र मंत्री दादा भुसे यांच्याबद्दल देखील आहे यामुळे शेतकऱ्यांना कैवारी कोण अन् पिळवणूक कोण थांबवणार हा प्रश्न उपस्थित होत आहे
कांद्याचा विषय केंद्रात असल्याने केंद्रिय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीच्या अपेक्षा आहेत मात्र त्यांच्यातर्फे अद्याप शेतकऱ्याच्या बाजूने ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही. जिल्ह्यातील इतर लोकप्रतनिधींकडून देखील शेतकऱ्यांना दिलासा दिसत नाही, ना सत्तेतील न विरोधातील कोणीही अद्याप भूमिका घेतली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे तर केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने शेतकऱ्यांसाठी भूमिका घेण्यासाठी कोणीही धजावत नाही मात्र मतदान मागण्याच्या वेळी सर्व पुढारी शेतकऱ्यांना प्राधान्य देत असतात. आता लोकप्रतिनिधी हरवल्याची भावना सर्वत्र आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे दे देखील मालेगाव तालुक्यातून आहेत त्यांनी देखील शेतकऱ्याच्या व्यथेकडे दुर्लक्ष केलं असल्याची चर्चा आहे.
कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. कांदा हा मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात प्रामुख्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकरी घेतात तसे कांदा हे कष्टकरी पीक आहे. रात्री शेतकरी शेतात पाणी भरत असतात तेव्हा कुठे हे पीक येत असते, भारतात 30.03 टक्के वाटा असलेले कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे मात्र सद्या कांदा उत्पादक अडचणीत दिसत आहेत यावेळी राजकिय नेत्यांनी आवाज उठवत बाजू लावून धरणे गरजेचं आहे मात्र मंत्र्यांसह सर्वच शांत आहेत. ‘भारताची कांद्याची टोपली’ महाराष्ट्राला म्हटले जाते मात्र ही टोपली आता अडचणीत सापडली आहे. यावेळी सरव्यानी दिलासा देण्यासाठी पुढे यावे ही मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले असून निदर्शने देखील केले आहेत. ज्यावेळी कांदा महागतो त्यावेळी सर्व नेते मंडळी एकवटत असते मात्र भाव पडल्यावर कोणीही समोर येत नसल्याने शेतकऱ्यांनी विचार करणे महत्वाचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम