Mahadeo – महादेवाचा पुन्हा चमत्कार! शिवलिंगाला डोळे दिसू लागल्याने भक्तांची मोठी गर्दी

0
50

The Mahadeo Eyes Appears on Shivling – महादेवाच्या पिंडीने आणि नंदीने दूध प्राशन केल्याच्या चमत्काराने मागे भक्तांनी गर्दी केल्याची घटना अजून भक्त विसरलेले देखील नसतील. आणि त्यात आता अकोल्यात महादेवाच्या पिंडीला डोळे दिसत असल्याच्या चमत्काराची घटना वाऱ्यासारखी पसरली आहे.

भक्तांची भक्ती कशी असते? हे काही वेगळं सांगायला नको. त्यात देवाच्या भक्तीपोटी लोक काहीही करायला तयार असतात आणि काही चमत्कारिक घडले तर त्यावर चटकन अंधविश्वास ठेवतात. असंच काहीसं अकोला जिल्ह्यातील अकोली बु. येथील महादेव मंदिताबाबत झालं आहे.

अकोली बु. येथील महादेवाच्या मंदिरातील पिंडीला डोळे दिसत असल्याचा चमत्कार भक्तांना येथे खेचून आणत आहे. भक्त मंडळी येथे मोठया प्रमाणावर गर्दी करत आहेत. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या चमत्काराचे खंडन केले आहे.

नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे महादेवाच्या पिंडीवर बर्फ साचल्याचा चमत्कार झाला अन भक्तांची येथे रीघ लागली. मात्र नंतर येथीलच काही पुजाऱ्यांनी हा बनाव केल्याचे नंतर उघड झाले होते.

Airtel 5G Plus सह 2 आश्चर्यकारक फायदे उपलब्ध आहेत, वापरकर्त्यांची संख्या 1 कोटी पार

आता अकोल्यात महादेवाच्या पिंडीला डोळे दिसू लागले आहेत. या नव्या घटनेने भक्तांच्या अंधविश्वासाला आयते खतपाणी देण्याचे काम काही लोक करत आहेत. तर काहींनी मात्र ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here