Export Ban | सोमनाथ जगताप – देवळा : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज देवळा-चांदवड मतदार संघात समावेश असलेल्या तसेच शेतकरी संघटनेचे प्रचंप्राण कै. शरद जोशी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विठेवाडी, झिरेपिंपळ येथे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या आव्हानास तत्काळ प्रतिसाद देण्यात आला.
विठेवाडी आणि झिरेपिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणांचा सामुदायिक रोष व्यक्त करत ‘ज्यांनी केली वांरवार शेतीमालाची निर्यात बंदी; त्यांनाच आता मतदान बंदी’ अशा प्रकारच्या घोषणा देत तशा आशयाचा फलक लोहणेर कळवण या राज्य मार्गांवरील विठेवाडी येथील चौफुलीवर येथे लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
Raj Thackrey | हा तर पैसे देऊन बलात्कार सुरू – राज ठाकरे
Export Ban | ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी
ज्यांनी शेतीमालाची निर्यातबंदी केली त्यंना येत्या लोकसभा निवडणुकीत मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार अशी खुणगाठ बांधून, घोषणाबाजी करत निर्यात बंदी करण्याऱ्या मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी दिला जातो आहे. याला आपण सर्व ताकदीनिशी विरोध करुन येणाऱ्या निवडणुकीत आपली संघटीत ताकद दाखवून दिली पाहिजे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केले आहे.
सकाळी दहा वाजता गावातील तरुणांनी भव्य फलक लावुन विधिवत पूजन करण्यात आले. या गावकऱ्यांनी पालकांसमोर जून्या उन्नाळी कांद्याची पुजा करुन केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचावी म्हणून संक्रांती निमित्ताने साकडं घालण्यात आले. यावेळी विठेवाडी, झिरेपिंपळ गावातील शेकडो कांदा उत्पादक तसेच राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते निंबा काकाजी निकम, प्रविण धनाजी निकम यांच्या शिवप्रेमी मित्रमंडळाने लक्षवेधी फलक लावुन अनावरण करण्यात आले.
Indian Army Day 2024 | आज ‘भारतीय लष्कर दिन’ का साजरा केला जातो..?
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, मिलिंद निकम, नंदकिशोर निकम, संजय निकम, तानाजी निकम, संजय सावळे, ललित निकम, ईश्वर निकम, लहानु निकम, स्वप्निल निकम, रावसाहेब निकम, पिंटु निकम, कैलास कोकरे, बंडु आहेर, बंटी आहीरे, योगेश हिरे, मधुकर निकम आदींसह शेकडो तरुण उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम