राष्ट्रवादीने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके आहेत तरी कोण? 

0
27

मुंबई |राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके आहेत तरी कोण? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर नामदेव जाधव हे चर्चेत आले आहेत. नामदेवराव जाधव युट्युबवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ हे युट्युबवर अपलोड केलेले आढळतील. नामदेवराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहील्यानंतर ते आणखी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांचे अनेक मोटिव्हेशनल व्हिडीओ युट्युबवर मोठ्या प्रमाणात पाहीले जातात. चला तर मग नामदेव जाधव यांच्याबद्दल जाणून घेऊया अधिक माहीती..

Political News | ५०० रुपयांत घरगुती सिलिंडर द्या; अभिजित बिचुकलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना शनिवारी (दि. १८) सायंकाळी घडल्याने खळबळ उडालेली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हादेखील दाखल झालेला आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार अशी जहरी टिका करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या नावाच्या पोस्ट आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. नामदेव सध्या भाजपाशी निगडित नेत्यांसोबत छायाचित्रात दिसत असतात. मात्र नामदेव जाधव यांचे शरद पवार यांच्या सोबतचेही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे नामदेवराव जाधव यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. नामदेवराव जाधव यांचा पेशा नेमका काय? ते नेमके काय करतात? याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे.

Retro classic CB350; बुलेटसारखी Hondaची नवी गाडी बाजारात दाखल

मोटिव्हेशनल स्पिकर्स म्हणून नामदेव जाधव प्रसिद्ध आहेत, याआधी त्यांनी आपली सुरुवात लेखक म्हणून केलेली होती. त्यांनी सर्वात आधी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहिल्याने नामदेव जाधव हे प्रसिद्धीच्या झोतात आले. या पुस्तकाचा खप वाढल्यानंतर त्यांची लेखक म्हणून अन्य पुस्तके आलेली आहेत. त्यानंतर त्यांनी तरुणा मोटिव्हेशनल करण्यासाठी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडील रसाळ वाणीमुळे आणि साध्या सोप्या शब्दात लोकांना आवडेल अशा सोप्या भाषेतील त्यांच्या भाषणांनी ते युट्युबवरदेखील ते प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. मध्यंतरी त्यांनी मटण घेण्याऐवजी माझी पुस्तकं वाचा अशी पोस्ट फेसबुकवर केल्याने मासांहारी प्रचंड नाराज झाले होते.

 

नामदेवराव जिजाऊंचे वंशज?

नामदेवराव यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात झाला आहे. त्यानंतर शिक्षणासाठी ते मुंबईत आले. पुढे त्यांना उत्तम सरकारी नोकरी मिळाली. परंतू सरकारी नोकरीत मन लागेना म्हणून त्यांनी नोकरी सोडली. मग पूर्ण वेळ व्यवसाय करायचे असे ठरविले. त्यावेळी त्यांना ते जिजाऊंचे वंशज आहेत असं कळल्याचे म्हटले जाते. यावरुन ते जिजाऊ यांचे वंशजच नसल्याची अनेकदा टिकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. त्यानंतर नामदेव जाधव हे लेखणाकडे वळले. त्यांनी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ पुस्तक लिहील्यानंतर ते व्याख्यानं देऊ लागले आणि विद्यार्थ्यांना उद्योजकशीलतेकडे वळा असा संदेश देऊ लागलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते सर म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here