Skip to content

शिंदे समर्थक आमदारांचा जल्लोष आणि “अनाथांचा नाथ एकनाथ” गाणे व्हायरल


मुंबई – भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि तिकडे गोव्यात शिंदे समर्थक आमदारांनी एकच जल्लोष साजरा केला. आमदारांच्या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर होत आहेच. पण ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये जे गाणे वाजले, त्याचीदेखील चर्चा सध्या जोरात रंगली आहे.

बऱ्याच दिवसांच्या बंडाळी नाट्यानंतर अखेर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे मुंबईत देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेत्यांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. इकडे अखेर शिंदे मुख्यमंत्री बनले तर दुसरीकडे गोव्यातील हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेले शिंदे समर्थक आमदारांनी शिंदेंच्या नावाची घोषणा होताच जल्लोषाचा ठेका धरला.

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची घोषणा होताच शिंदे समर्थक आमदार जल्लोष साजरा करताना

ह्या अभूतपूर्व जल्लोषाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यात आमदार बेभान होऊन नाचले आहे. पण ह्या व्हिडिओत जे गाणं ऐकायला मिळत आहे, तेही तितकेच खास आहे. कारण हे गाणं नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आधारित आहे.

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ असे ह्या गाण्याचे बोल असून, ज्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले आहे. संदीप माळवी यांनी हे गाणे रचले असून प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी हे गाणे गायले आहे. हे गाणे एकूणच एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर आधारित आहे. ह्या गाण्यामध्ये बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंबद्दल काढलेले उद्गार, पूर परिस्थितीची केलेली पाहणी आणि कोविडकाळात केलेली मदत यावर साडेचार मिनिटांच्या व्हिडिओत दाखवले. हा व्हिडिओ यूट्यूबवर गेल्या वर्षी रिलीज झाला असून आतापर्यंत साडेपाच लाख व्ह्यूज इतके मिळाले आहे.

https://youtu.be/FX_qU9RAWdk

ह्या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनीदेखील व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!