भात बियाणे कंपनीकडून खेडभैरव येथील शेतकऱ्याची फसवणूक

0
28

राम शिंदे प्रतिनिधी
सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड भैरव येथे यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी मोहन रामनाथ वाजे या शेतकऱ्याने दप्तरी १००८ वाण असलेले भाताचे बियाणे खरेदी केले. १४५ दिवसांत निघणारी दफ्तरी कंपनीचं १००८ वाणाचे भात बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करत लागवड केली खरी मात्र हे पीक शेवटच्या टप्प्यात निसवले खरे पण त्याला काळ्या रंगाचे कुसळ असलेले लोंबट आले. लागवड केलेले क्षेत्र हे १ हेक्टर असून त्यामुळे मोहन वाजे या शेतकऱ्याची संपूर्ण मेहनत वाया जाऊन लागवडीचा खर्च संपूर्ण पाण्यात गेल्याने संबंधित शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे.

मोहन वाजे या शेतकऱ्याने कृषी विभाग व संबंधित भात बियाणे कंपनीला दुकानदार मार्फत सदर झालेल्या फसवणुकी संदर्भात कळविले असता आजपर्यंत संबंधित कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही. कृषी विभागाने शेतकऱ्याच्या शेतात येऊन पहाणी केली व तसा अहवाल देखील दिला व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला पण भात बियाणे कंपनीने शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानी कडे ढुंकूनही बघितले नाही. त्यामुळे दफ्तरी कंपनीने आपली फसवणूक केली असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनात आले आहे.

बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दिली असून दफ्तरी कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी खेड परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी केली आहे.

दप्तरी कंपनीवर कृषी विभागामार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकरी मोहन वाजे यांच्यासह अन्य शेतकरी बांधवांनी केली असून कृषी विभाग व दप्तरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर येऊन पाहणी करावी परंतु कृषी विभागाचे अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ,कृषी विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश परदेशी, कृषी अधिकारी पंचायत समिती के.एल भदाणे, कृषी सेवा विक्रेता रमेश वाजे यांनी भेट दिली असता तक्रार निवारण समितीने पंचनामा करून अहवालात असे नमूद करण्यात आले की लागवड केलेली दप्तरी १००८ हे संपूर्णपणे कुसळी भातआले यात भाताचे दाना भरीव नाही आहे असल्याचे नमूद केले परंतु झालेल्या नुकसानीकडे दप्तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही.त्यामुळे शेतकरी मोहन वाजे व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.

” संबंधित कंपनीने माझी फसवणूक केल्यामुळे माझा लागवडीचा खर्च वाया गेला.झालेल्या नुकसानीची पहाणी कृषी विभागाने केलेली असून संबंधित कंपनीवर कारवाई करून मला न्याय मिळणे गरजेचे आहे.जर सदर संबंधित कंपनीने माझी झालेली नुकसानभरपाई दिली नाही तर येत्या काही दिवसांत मी आमरण उपोषण करून न्याय मागेल.यासोबतच जिल्हाधिकारी यांच्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन दाद मागेल_ ”
मोहन वाजे, नुकसानग्रस्त शेतकरी खेड भैरव इगतपुरी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here