Pomegranate News | बळीराजाची दिवाळी होणार गोड! डाळिंबाची मोठी दरवाढ

0
23

Pomegranate News | मालेगाव : डाळिंबाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमादे तालुक्यांत डाळिंबाचे उत्पन्न वाढू लागलेले आहे. देशातील पुर परिस्थिती पूर्णपणे निवळली असून कर्नाटकमधील डाळिंबाची आवक मंदावलेली असल्याने कसमादे तालुक्यातील डाळिंब बाजारपेठेत भाव खात आहेत. दोन महिन्यांच्या तुलनेने डाळिंबाला किलोमागे पन्नास रुपयाने वाढ झालेली आहे. उच्च प्रतीचा डाळिंब 140 ते 165 रुपये किलोने घाऊक दरात विकला जात आहे.

आगामी दिवाळी आणि छटपूजा हे सण लक्षात घेता कसमादे तालुक्यातील मृग बहारातील डाळिंबाला मागणी आहे. ज्यांच्याकडे चांगला प्रतीचा माल आहे त्या शेतकऱ्यांची डाळिंबामुळे दिवाळी गोड होऊ शकते.  डाळिंबाचे भाव जुलै ते ऑगस्टमध्ये घसरलेले होते. देशांतर्गत पुर परिस्थितीमुळे मोठ्या बाजारपेठांमध्ये डाळिंब पोहोचण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान या काळात कर्नाटकमधील डाळिंब मोठ्या प्रमाणावर बाजारात येत होते.

iPhone13| आयफोनचं स्वप्न पूर्ण होणार; मिळवा iPhone13 फक्त २०,००० रुपयांत…

या पार्श्वभुमीवर कसमादे तालुक्यातील उच्च प्रतीचा डाळिंब 110 ते 125 रुपयापर्यंत खाली आलेला होता. साधारण प्रतीचा डाळिंब 70 ते 100 रुपये किलो रुपयाने विकला गेला. कर्नाटकमधील डाळिंबाची आवक कमी झालेली आहे. सध्या डाळिंबाने किलोला दीडशेचा दर गाठलेला आहे. यातच उच्च प्रतीचा डाळिंब 165 रुपये किलोने विकला गेला. कसमादे तालुक्यात मृग बहारातील डाळिंबाला चांगली मागणी आहे. आगामी दिवाळी आणि उत्तर भारतातील छटपुजेचा सण लक्षात घेता घाऊक व्यापारी कसमादे तालुक्यात दाखल झालेले आहेत. आठवडाभरात डाळिंब काढणीला वेग येणार आहे.

देशांतर्गत बाजारपेठांबरोबरच या भागातील डाळिंब बांगलादेशला निर्यात केला जाईल. मृग बहारातील डाळिंब बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पिकवला गेला होता. बदलत्या हवामानामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तेलकट डाग असलेला डाळिंब अत्यंत कमी किमतीत विकावा लागतो आहे. स्थानिक बाजारात साधारण आणि मध्यम प्रतीचा डाळिंब 100 ते 120 रुपये किलोने मिळतो आहे.

आत्ताची मोठी बातमी | मराठा आंदोलनावर सरकारने काढला मोठा तोडगा!


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here