घरोघरी मातीच्या चुली शिंदे गटातील बंडखोर आमदारांचे वाद चव्हाट्यावर

0
34

किर्ती आरोटे

द पौइंट नाऊ प्रतिनिधी:  स्वःतला कट्टर, कडवट शिवसैनिक म्हणवून घेणारे शिवसेनेचे माजी मंत्री आणि एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे आजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि भाजपा बरोबर सत्ता स्थापन केल. शिवसेनेत आपल्याला योग्य वागणूक मिळत नाही, आपल मत ऐकून घेतलं जात नाही आपल्याला निधी दिला जात नाही. मुख्यमंत्री आपल्याला भेटत नाही अशी कारण देत ज्या पक्षाच्या तिकिटावर आमदार झालेत अशा शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली.

येथे क्लिक्करून एका क्लिप

आता शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांचा कार्यकर्त्यासोबत झालेला फोनवरील एक संवाद सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल होत आहे.त्यामध्ये ते गुलाबराव पाटील यांना कंटाळून शिवसेना सोडली पण तेच पदरात आले अस बोलताना दिसून येताय अर्थातच म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली तेच चित्र सध्या शिंदे गटात पाहायला मिळतंय. कारण आता आमदार चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

“शिवसेनेतील स्थानिक लोकांनी मला फार त्रास दिला, माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नाही, मला एवढा त्रास दिला कि मी त्यांच्यासोबत राहू नये अशी परिस्थिती निर्माण केली होती. ज्या शिवसेनेतल्या लोकांनी मला पाडल त्यांना मंत्रीपद दिल गेलं.”अशी खंत आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

“यांचा त्रास किती सहन करू, गुलाबराव पाटलांनी शिवसेना वाढवून दिली नाही, जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपवणारा माणूस म्हणजेच गुलाबराव पाटील.” ही गोष्ट मी उद्धव ठाकरे यांना जाऊन सांगितली पण त्यांच्याकडून काहीच कार्यवाही झाली नाही, उलट त्यांना मंत्रीपद दिल याचं मला खूप वाईट वाटत अशी खंत चिमणराव पाटील यांच्याकडून यावेळी व्यक्त केली गेली.

ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्याकडून दहा जन्म सुध्दा उपकार फिटले नसते अशी चिमणराव पाटील म्हणाले आहेत. माझ्याशी कोणीही बोलत नव्हते, मला वर येऊ दिले नाही अस म्हणत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here