Dindori | मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अंतर्गत मोहाडी येथील थोरात महाविद्यालयास पाच लाखांचे बक्षिस

0
42
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयास मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्रमांक २ या उपक्रमासाठी नाशिक जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून पाच लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अभियानाची मुख्य उद्दिष्टे ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे. शासनाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनास बळकटी देणे. तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस चालना देणे हे होते.

Dindori | दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ 24 उमेदवारांनी केले 32 अर्ज दाखल…

मोहाडी विद्यालयाने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल

अभियानात सहभागी शाळांना गुणांकनासाठी विविध टप्पे होते. त्यात पायाभूत सुविधा ३३ गुण, शासन ध्येय धोरणांची अंमलबजावणी ७४ गुण, शैक्षणिक संपादमूक ४३ गुण, असे एकूण १५० गुणांचे गुणांकन होते. यापैकी १३० गुण मिळवून मविप्र संचलित रावसाहेब थोरात महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयाने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

Dindori | स्वाध्याय परिवाराचा आज “मनुष्यगौरवदिन”

विद्यालयाच्या या यशाबद्दल मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, सरचिटणीस ॲड. नितीनभाऊ ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी-पेठचे संचालक प्रवीणनाना जाधव, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके, डॉ. विलासराव देशमुख, डॉ. नितीन जाधव, पंचायत समिती दिंडोरी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता अहिरे, कैलास पगार, वंदना चव्हाण, केंद्र प्रमुख विजय निकम, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश सोमवंशी, उच्च माध्यमिक शालेय समितीचे विजय जाधव, अभिनवचे अध्यक्ष रामराव पाटील, आयटीआय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र जाधव व सर्व शालेय समितीचे सदस्य, मोहाडी ग्रामपालिकेच्या सरपंच आशाताई लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, पालक संघाचे उपाध्यक्ष जी. एम. गायकवाड, आयटीआय प्राचार्य एम डी. वारूगंसे, जि.प. मुख्याध्यापक राजेद परदेशी, प्रा. कैलास कळमकर आदींनी अभिनंदन केले आहे. उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ गडाख, ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here