सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी तर महायुतीच्या उमेदवाराला होणारा पराकोटीचा विरोध लक्षात घेता माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची पुनरावृत्ती करणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामागे कारण ही तसेच आहे, हरिश्चंद्र चव्हाण यांचा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दांडगा जनसंपर्क अजूनही टिकून आहे. तसेच त्यांचे सर्व पक्षीय संबंध असून, गावागावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. दिंडोरी लोकसभा मतदार संघात त्यांच्या इतका थेट जनसंपर्क असलेला आणि त्यांच्या बरोबरीचा उमेदवार आज तरी नाही. (Dindori)
Dindori | हरिश्चंद्र चव्हाणांचा करिष्मा
1995 च्या सुरगाणा – पेठ विधानसभा निवडणुकीत इतर सर्व विरोधकांचे डीपॉझिट जप्त करण्याचा करिष्मा हरिश्चंद्र चव्हाण यांनी करून दाखविला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने भारती पवार यांना विरोध असतानाही पुन्हा उमेदवारी दिल्याने मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांसह शेतकरी, आदिवासी भागात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळेच हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेऊन गनिमी काव्याने कार्यकर्ते कामाला लावले असल्याची माहिती समोर आली आहे. (Dindori)
भाजपचे कार्यकर्ते चव्हाणांचे काम करताय..?
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदार संघात चव्हाणांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपाला बसणार हे यामुळे स्पष्ट झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते चव्हाणांचे काम करीत असल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. तर, हरिश्चंद्र चव्हाण पुन्हा एकदा अपक्ष निवडणुक लढऊन 1995च्या विधानसभा निवडणूकीची पुनरावृत्ती करणार का..? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Dindori)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम