धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक हिट अँड रनची प्रकरणं समोर येत आहे. यातच आता पुन्हा धुळे येथून एक प्रकरण उघडकीस आले असून, या अपघातात हर्षल भदाणे या युवा पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. हर्षल हे धुळे येथील आपल्या मुळगावी कामानिमित्त गेले असताना धुळे-सोलापूर महामार्गावर एका मद्यधुंद ट्रक चालकाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने कारचा जागीच चक्काचूर झाला. यात हर्षल गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, या कारमधील अन्य दोघेजण जखमी आहेत. अपघातानंतर सदर मद्यधुंद ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
Nashik News | चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अपघात; एकाच मृत्यू, ३ गंभीर जखमी
यानंतर चालकाने चालकाने ट्रक धुळे शहरात आणला असता, येथे 12 पत्थर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याला ट्रक पुढे नेता आला नाही. येथेही या ट्रकने दोन दुचाकींना धडक दिली होती. गरताड येथील अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली असल्याने पोलिसांकडूनही ट्रकचा शोध सुरू होता. दरम्यान, अखेर हा ट्रक आणि चालकाला धुळे शहरातील 12 पत्थर चौक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. पत्रकार हर्षल भदाणे यांच्या अपघाती निधनाने पत्रकारिता क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने भदाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हर्षल भदाणे हे सध्या TIMES NOW या वृत्त वाहिनी यांनी कार्यरत होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या करियरची सुरुवात ही साम टीव्ही या वृत्त वाहिनीमध्ये अँकर म्हणून केली. यानंतर TV9 मराठी, लोकशाही या वृत्त वाहिन्यांमध्येही ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम