Dhangar Reservation | धनगर आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; सह्याद्री आदितीगृहावरील बैठक संपन्न

0
23
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

Dhangar Reservation | सध्या धनगर समाजाला एनटी संवर्गातून आरक्षण मिळत आहे. पण देशभरात धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाजाचे काही आंदोलक पंढरपुरात उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये धनगर आरक्षणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे आगामी काळात धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठेवले आहे असे बैठकीयंती मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितले.

Dhangar Strike | धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

काय म्हणाले शंभूराज देसाई? 

“मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या सकल धनगर समाजाच्या आंदोलकांच्या भेटीसाठी गेलो होतो. आज सुट्टीचा दिवस असतानाही सर्व सिनिअर अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्याचबरोबर आपण याबाबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांसोबतही बोलून माहिती घेऊ शकता असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सरकारने काय निर्णय घेतला? 

धनगर आणि धनखड हे एकच आहेत. अशी सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी होती. तेव्हा अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा. तो जीआर कशा पद्धतीचा असावा यासाठी तीन वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांची तसेच त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आले होते त्यापैकी पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये त्यांनी हा जीआरचा मसुदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात कसा टिकला पाहिजे याबाबतीतील जीआरचा ड्राफ्ट तयार करतील ही समिती पुढच्या चार दिवसातच बसेल आणि ॲड. जनरल साहेबांचं त्यावर मत घेतलं जाईल आणि पुढची कार्यवाही सकारात्मक करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला गेला.” अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

Dhangar reservation | धनगर समाज पुन्हा आक्रमक; अनेक ठिकाणी आंदोलने

त्याचबरोबर जे उपोषण करते पंढरपुरात बसले आहे. त्यांना राज्य सरकारने विनंती केली आहे की त्यांनी आपले उपोषण स्थगित करावे. त्यासाठी आम्ही विभागीय आयुक्तांना पाठवले देखील आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. तसेच धनगर समाजाच्या बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. आम्ही उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी तातडीने चर्चा करू आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करू अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here