द पॉईंट नाऊ ब्युरो : राजकारणात कोणत्या क्षणी काय होईल याचा काही नेम नाही. नुकतेच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आणि महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. परंतु, अजून काहीशी चर्चेस कारण ठरणारी बातमी समोर येते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याने, नव्या चर्चेस कारण मिळाले आहे. गुरुवारी मध्यरात्री मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजून काय शिजायचं बाकी आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे.
भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा असतांना भाजपने सर्वांनाच धक्का देत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री. यामुळे शिंदे गटाने मोठा जल्लोष केला असला, तरी केंद्राने फडणवीस यांचा काटा काढला, म्हणून विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याने चर्चेला कारण मिळाले आहे. आणि आता अजून महाराष्ट्राच्या राजकारणात काय व्हायचे बाकी आहे किंवा काय होऊ शकते या चर्चेला आयते कोलीत मिळाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम