देवळा | देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न झाल्याने उद्या शनिवार (दि. ४) पासून देवळा येथे राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी, स.पो.नि. दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र शासनाने दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेल्या शासननिर्णयाद्वारे राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केलेला असुन सदर शासननिर्णयात नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा तालुक्यांचा या यादित समावेश नाही.
कसमादे | कांद्याची कोटींची उड्डाणं घेणाऱ्या कसमादेवर कांदा न पिकवण्याची वेळ!
देवळा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून मजूर वर्गाच्या हाताला काम नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा या मागणीचे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले होते. सदर निवेदनानंतरदेखील शासनाकडून देवळा तालुका दुष्काळी जाहीर होण्याबाबत कुठलीही कार्यवाही होतांना दिसून आली नाही.
याच्या निषेधार्थ देवळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या शनिवारी (दि. ४) पासून देवळा पाचकंदील येथे अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याप्रसंगी होणाऱ्या पुढील पेचप्रसंगास शासन जबाबदार राहील असे शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक! मुलीनं प्रियकराशी लग्न करु नये म्हणून कुटुंबीयांचा अघोरी प्रकार
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल आदींना देण्यात आलेले आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष दिनकर निकम, प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, आर्की. स्वप्निल सावंत, दिलीप आहेर आदींच्या सह्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम