Deola | खर्डेत राम, लक्ष्मण, सीताच्या वेषभूषेत चिमुकल्यांची फेरी

0
81
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  काल अयोध्या येथे श्रीराम मंदिरार राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी देशात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपन्न होत असताना खर्डे (ता. देवळा) येथील हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कुलमधील चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचे औचित्य साधून श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा परिधान करत गावातून श्रीरामाच्या जय घोषात फेरी काढली.

Deola | राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सहस्रलिंग रामेश्वर येथे संपन्न

यावेळी गावातील पटांगणात साकारलेल्या कुटीबाहेर चिमुकल्यांच्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खर्डे गावातील श्रीराम मंदिराचे दर्शन घेत जय श्रीराम, जय श्रीराम नावाचा गजर करत चिमुकल्यांनी परिसर दणाणून सोडला होता. याकामी संचालक किरण जाधव, प्राचार्या – वैशाली जाधव, शिक्षक पूजा चव्हाण, संध्या देवरे, अनिता निरभवणे, केदारे मॅडम, प्रियांका जाधव, कावेरी सावंत, महेश्वरी गवारे, वर्षा मोरे, भुवनेश्वरी दिक्षित, संदीप खरे आदींसह कर्मचारी देविदास कुवर, निलेश सोनवणे, सीमा जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here