Deola | देवनदीच्या पुरात रस्ता वाहून गेला; शेतांमध्येही पाणी साचले

0
94
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील खर्डे व वडाळा शिवारात गुरुवारी (दि. १३) रोजी दुपारी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे देवनदीला पूर येऊन या पुरात दोडी धरण ते जाधव वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता वाहून गेला. त्याच बरोबर याठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

खर्डे (ता. देवळा) येथे गुरुवारी चार वाजेच्या सुमारास कांचने, वडाळा व खर्डे शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने देवनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. शेतात पाणी साचल्याने बांध फुटले. पुराच्या पाण्याने दोडी धरणात देखील बऱ्यापैकी पाणी साचले. यापुरात धरणालगत असलेला रस्ता वाहून गेल्याने याठिकणच्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.

Deola | देवळा तालुक्याच्या पूर्वभागात पुरपाणी सोडण्यासाठी सांगवी येथे आमरण उपोषण

Deola | भास्कर भगरे यांचे तहसील प्रशासनास आदेश 

ह्या पावसात परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे खासदार भास्कर भगरे यांना समजताच त्यांनी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधून माहिती घेतली व झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तहसील प्रशासनाकडून तसेच पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी घटनास्थळी भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली असून, पुरपाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आल्याची माहिती अभियंता राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

मुसळधार पावसाने याठिकाणचा रस्ता वाहून गेल्याने परिसरात राहणाऱ्या लोकांची जाण्या येण्याची गैरसोय झाली असून, उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे हाल होणार आहेत. याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Deola | नवनिर्वाचित खासदार भगरेंकडून देवळ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here