सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शासकीय योजना, नोकऱ्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी भारत सरकारने मेक इन इंडिया मोहीम सुरू केली असून, याचाच एक भाग म्हणून आज तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येऊन खऱ्या अर्थाने सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्या गोरगरीब जनतेच्या पदरात पाडून घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले हे निस्वार्थी काम नक्कीच वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आज येथे केले. देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी, माळवाडी, फुले माळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आज सोमवारी (दि. ७) रोजी सकाळी १० वाजता बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात १२०० बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
Deola | देवळा नगरपंचायत हद्दीतील विधवा महिलांना मिळणार वैयक्तिक लाभ
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार आयुक विकास माळी, गटविकास अधिकारी राजेश कदम, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रमोद पाटील, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. संजय निकम, डॉ. अनिल चव्हाण, ग्रामसेवक विजय देवरे, संभाजी देवरे, सरस्वती वाडीचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत आहेर, माळवाडीचे उपसरपंच इंजि. मयूर बागुल, माजी सरपंच विलास भामरे, आदींसह सदस्य, बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. आहेर पुढे म्हणाले की, “राज्य व केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, त्याचा सर्व लाभार्थ्यांना फायदा व्हावा. याकामी अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कामी पुढाकार घ्यावा. वेळोवेळी यासाठी कर्मचारी वर्गाला सूचना देऊन कोणी लाभार्थी वंचित राहणार नाही. याची काळजी घ्यावी” असे सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम