Deola | देवळा शहरात प्लास्टिक बंदी; दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

0
5
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा अभियांतर्गत देवळा शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहीम अंतर्गत बुधवार (दि.२२) रोजी छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत ६ किलो प्लास्टिक देवळा नगरपंचायतीने विविध विक्रेत्यांकडून जप्त केले असून, ही मोहीमे अंतर्गत प्लास्टिक वितरण व वितरक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिला आहे.

एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहीम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्याला ही मोहीम राबविण्याचे कळविले असून, बुधवारी देवळा नगरपंचायतीने सदर मोहीम शहरात राबविली. कर्मचाऱ्यांनी शहरातील विक्रेते, फुलविक्रेते, स्थानिक बाजारपेठेत, भाजीपाला मंडई आदी दुकानांना भेटी देऊन एकल वापर प्लास्टिकची जप्ती व बंदी करण्याची मोहीम राबविली. या मोहीमेतून ६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

Deola | देवळा नगरपंचायतीच्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम; शहरात प्लास्टिक जप्तीची कारवाई

तसेच यापुढे एकल वापर प्लास्टिक वापर न करण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्या. ही मोहीम सुरु राहणार असून अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास वितरण व वितरक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, लेखापाल नितीन भवर, कार्यालयीन अधिक्षक पवन कस्तुरे, लेखापरीक्षक जुगल घुगे, सीएलटीसी अभियंता तुषार बोरसे, दिग्विजय देवरे, शहर समन्वयक सुरेश आहेर, चंद्रकांत चंदन, समाधान पगारे, दिपक गोयल आदी कर्मचाऱ्यांनी राबवली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here