Deola | वेतन प्रलंबित असल्याने देवळा पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा पंचायत समितीच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन अभावी उपासमार होत असल्याने नाशिक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (दि.1) रोजी नववार्षाच्या प्रारंभीच पंचायत समितीच्या कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळा पंचायत समितीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे माहे ऑक्टोंबर 2024 चे वेतन अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. याशिवाय शासनाने देऊ केलेला एकोणावीस महिन्याच्या वेतनातील सुरुवातीच्या तीन महिन्याच्या वेतनातील फरक शासनाने पंचायत समिती खात्यावर तीन महिन्यापूर्वी जमा केला.

पण तालुकास्तरावरून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तो वर्ग न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली व त्यांनी डिसेंबर अखेर वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर न केल्यास एक जानेवारीपासून बेमुदत थाळीनाद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन (दि.26) डिसेंबर 2024 रोजी पंचायत समितीला दिले होते. त्या अनुषंगाने आज 1 डिसेंबर रोजी तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पंचायत समिती कार्यालयापर्यंत थाळी नाद फेरी काढली. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत वेतन व वेतनातील फरक जीपीएफ जमा होईल अशी तोंडी आश्वासन दिले.

Deola | देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लिलाव शेडचे भूमीपूजन

मात्र यावर न थांबता कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता गटविकास अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन तासाभरात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केले. याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने गट विकास अधिकारी यांचे आभार व्यक्त केले व आंदोलन मागे घेतले. नाशिक जिल्हा अध्यक्ष बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन यशस्वी झाले. यावेळी नाशिक जिल्हा सचिव स्वप्निल अहिरे, जिल्हा सहसचिव शुभानंद देवरे, देवळा तालुका अध्यक्ष भूषण अहिरे, उपाध्यक्ष पवन कुमार देवरे, तालुका सचिव दीपक सूर्यवंशी, तालुका सहसचिव लखन गरुड, संदीप बच्छाव, राहुल बुजवा, प्रकाश शिंदे, सतिष आहिरे, पुंडलिक सावंत, निलेश साबळे, संजय सोनवणे, सतीश आयरे, सचिन खरे, दीपक मोरे, राजाराम पवार, हितेंद्र बच्छाव, वैभव आहेर, चेतन आहेर, ईश्वर मोरे, अशोक सोळसे, भारत गायकवाड, निंबा आहिरे, भास्कर कुवर, पुंडलिक सोनवणे, केदा कोकरे, दीपक ठाकरे, अशोक सोळसे, अनिल पवार, स्वप्निल अहिरे, एकनाथ बच्छाव, समाधान केदारे, शिवाजी देवरे आदी कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here