कसमादे | देवळा तालुक्यातील कापशी गावात एकूण खरीप कांद्याची 95 टक्के लागवड झालेली होती. मात्र अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रत्येक शेतकऱ्याने 90 टक्के क्षेत्र हे लागवड करून सोडून दिले आहे. पिण्यासाठी पाणी नाही तर शेतीचं काय कराव? असा प्रश्न कापशीतीलच नव्हे तर कसमादे पट्ट्यातील काही शेतकऱ्यांना पडलेला आहे. तसेच कांद्याच्या बाबतीत देवळा तालुक्यात कोटींची उड्डाणं घेणारे कापशी हे गाव यंदा प्रचंड नुकसानीत गेलं आहे.
अत्यल्प पावसामुळे संपुर्ण कसमादे पट्ट्यातील भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही आहे. यामुळे कसमादे पट्ट्यातील काही शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झालेली आहे. शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच तालुक्यातील धरण, बंधारे, पाझर तलाव आदीतील पाणी साठे आरक्षित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे उन्हाळी कांदा लागवडीवर गंभीर परिणाम होणार आहे. परतीच्या पावसाच्या भरवशावर शेतकयांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले आहे.
Manoj Jarange | ‘मनोज’ नावाच्या व्यक्तींना मिळणार मोफत जेवण…
तालुक्यात ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा..
महसूल मंडळात पिकविम्यासाठी जर एखाद्या भागात २१ दिवस पावसाचा खंड असेल तर तो भाग दुष्काळी भाग म्ऊहणून जाहीर केला हतो. तर कापशी गावात एक नाही तर दोन खंड होऊन गेलेले आहे. यावेळी मक्याचही पिक पावसामुळे वाया गेलं आणि कांद्याच्या बाबतीतही तेच झालं. तालुक्यात फक्त ५% लोकांकडे पाणी उपलब्ध आहे. तर हा तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. पण देवळा तालुका मात्र दुष्काळग्रस्त तालुक्यात समाविष्ट केला नाही. अशीच परिस्थिती कापशी बरोबरच भिलवाड, खर्डे, वडाळा, दहीवड तसेच उमराणे या भागातही अशीच भीषण परिस्थिती आहे. मागील वर्षापासून गावात ट्रॅकंरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात देखील तालुक्यात हीच दशा होती. पुढील उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होऊ शकतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सरकारने यावर ठोस उपाय काढत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. – जयदीप भदाणे, शेतकरी (कापशी)
धक्कादायक! मुलीनं प्रियकराशी लग्न करु नये म्हणून कुटुंबीयांचा अघोरी प्रकार
पाण्याचा प्रश्न वाढत जाईल तसं आम्हाला कांदा लागवड शून्यावर आणावी लागेल..
यावेळी माझ्याकडील जी शेती ओलीताखाली असायची ती आता अशी परिस्थिती आहे कि फक्त अर्ध्या शेतीला पाणी पुईल इतकाच पाणीसाठ उपलब्ध आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न देखील भयानक झालेला आहे. जसा जसा पाण्याचा प्रश्न आणखी वाढत जाईल तसं तसं आम्हाला कांदा लागवड शून्यावर आणावी लागेल. लोकप्रतिनिधी किंवा शासन हे या गोष्टीवर काहीही उपाययोजना करताना दिसत नाही. शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी शेक्त्र्यांसाठी चाऱ्याचा, कर्जमाफी, तसेच विजबिल या काही बाबींसाठी तरतूद करायला हवी. – शिवाजी पवार, शेतकरी (वाखारवाडी)
चांदवड आणि देवळा ह्या तालुक्यांतही दुष्काळ तातडीने जाहीर करा; आमदारांची मागणी
नाशिकच्या येवला तालुक्यापेक्षा नांदगाव तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याचा दावाही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी केला. तसेच नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे नांदगाव तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना शेतकरी तथा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, चांदवड आणि देवळा ह्या तालुक्यांतही दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अशी मागणी मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली आहे. नाहीतर, तालुक्यातील जनतेसोबत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव, तर छगन भुजबळ यांच्या येवला व सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम