Deola News | तालुका स्तरीय विज्ञान परिषदेत जनता विद्यालयाचा डंका

0
15
Deola News
Deola News

Deola News |    देवळा येथे सुरू असलेल्या २० व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘अभिनव बाल विकास मंदीर’ तसेच ‘जनता विद्यालया’ने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड येथे आयोजित सन २०२३-२४ ह्या आशिक्षणिक वर्षाच्या २० व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळ संचालित अभिनव बल विकास मंदिर आणि जनता विद्यालय देवळा ह्या शाळेतील विद्यार्थिनी अनुक्रमे तृप्ती निकम, समिक्षा शिंदे ह्या विद्यार्थिनींनी बनवलेल्या नदी स्वच्छ करणारे यंत्र तसेच सांडपाण्याचे व्यवस्थापन या पर्यावरण पूरक उपकरणाला ह्या प्रदर्शनाला माध्यमिक विभागामध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.Deola News

Deola News | राज्य सहकारी बँकेकडून वसाकाची मालमत्ता जप्त; कामगारांमध्ये तीव्र नाराजी

दरम्यान, या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षण आधिकारी प्रवीण पाटील आणि देवळा तालुका गट शिक्षण आधिकारी सतिश बच्छाव यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनी तृप्ती निकम, समिक्षा शिंदे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती डी. बी. आहेर, आणि एम. एन. सुर्यवंशी हेदेखील याठिकाणी उपस्थित होते.Deola News

Deola News | सुतार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक येथे आमरण उपोषण सुरू

तसेच ह्या सदर उपकरणासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. डी. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या शिक्षिका डी.बी. आहेर आणि सर्व विज्ञान विषय शिक्षक तसेच कला विषयक शिक्षिका एस. एल.जाधव यांनी मार्गदर्शन केले आहे.  विद्यालयाने तसेच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ह्या उत्तुंग यशा बद्दल माविप्र समाजाचे संचालक मा. श्री विजय पोपटराव पगार यांनी विद्यार्थिनी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक व विज्ञान विषय शिक्षकांचे अभिनंदन केले व त्यांना जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.Deola News


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here