सोमनाथ जगताप – देवळा | ब्रिटिश सत्तेविरोधात भारतीय क्रांतीकारांनी बलिदान दिले होते. या बलिदानाची जाणीव आजच्या विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे आणि राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आज विद्यार्थ्यामध्ये असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने यांनी येथे केले आहे.
Deola News | देवळा येथे संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी
देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात समाजशास्त्र मंडळातर्गत क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले आहे.
Onion Issue | कांदा निर्यात बंदी संदर्भात धोरण तात्काळ मागे घ्या; आ. डॉ. राहुल आहेर यांची मागणी
या छायाचित्र प्रदर्शनास वरिष्ठ आणि कानिष्ठ महाविद्यालयातील तसेच जिजामाता गर्ल्स हायस्कुल आणि श्री. शिवाजी मराठा हायस्कुल मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य पी. एन. ठाकरे हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. काकविपुरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. एस. डी. ठाकरे, प्रा. अमित बोरसे, प्रा. डॉ. जे. व्ही. चंद्रात्रे तसेच इतिहासाची आवड असणारे धनंजय आहेर तसेच महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आभार प्रा. यशवंत खैरनार यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम