Deola News | सोमनाथ जगताप – वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखान्याची (अवसायनात) थकबाकी वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने बुधवार रोजी कारखान्याची सर्व मालमत्ता जप्त केल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली असून कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Deola News | सुतार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक येथे आमरण उपोषण सुरू
Deola News | नेमकं प्रकरण काय?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव युनिटने विठेवाडी (लो) येथील वसाका २५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेला होता मात्र हा कारखाना गैरव्यवस्थापनामुळे बंद आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी प्रचंड कर्ज आणि अनागोंदी कारभार, कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले ऊस बिल यामुळे हा कारखाना बंद पडला. तो परत सुरू व्हावा म्हणून ऊस उत्पादक संघर्ष समिती व कामगार संघटनेने अतोनात प्रयत्न केले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडे नजरगहाण असलेला कारखाना सुरू करण्यासाठी कामगार युनियनने धाराशिव प्रशासनाबरोबर करार केलेला होता परंतु शिखर बँकेने धाराशिव प्रशासनाशी परस्पर २८ वर्षांसाठी दीर्घ मुदतीचा करार केला. त्यामुळे कारखान्याचे हजारो सभासद व कामगार नाराज झाले होते.
त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिखर बँकेशी संगनमत करून हो करार परस्पर धाराशिव प्रशासनाला कसा काय दिला? असा सवाल सभासदांकडून वांरवार विचारला जात होता, कामगारांचे आठ ते दहा वर्षांपासूनचे थकीत देणे देण्यास धाराशिव प्रशासन सातत्याने टाळाटाळ करीत होते. अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी, धाराशिव व्यवस्थापन व कामगारांबरोबर बैठका होऊनदेखील कामगारांच्या हाती काहीही लागत नव्हते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कामगारांचे फायनल पेमेंट, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड रक्कम न मिळाल्याने अनेक कामगारांनी नैराश्यातून आपले आयुष्य संपवले. वसाका कारखाना बंद असल्याने व पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्याने अलीकडच्या काळात वसाका कार्यस्थळावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
CM Eknath Shinde | विरोधी पक्षांचे अवसान गळाले; मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच घेरले
धाराशिव प्रशासनाला कारखाना सुरू करून थकीत देणे अशक्य झाल्याने धाराशिव उद्योग समूहाने कारखाना चालविण्यास नकार दिला. शिखर बँकेशी झालेला करार रद्द करावा, अशी भूमिका धाराशिव व्यवस्थापनाने घेतली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कारखान्याची चाके पुन्हा एकदा सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कांदा आंदोलनानिमित्त माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असता, वसाका बचाव कृती समितीने त्यांना साकडे घालत कारखाना सुरू करण्यासाठी विनंती केली होती.
कारखान्याची जप्त केलेली मालमत्ता बँकेने दि. ०३.०९.२०१८ रोजीच्या भाडे करारानुसार धाराशिव साखर कारखान्यास देऊन तसा सुपस्त नामा दि. ०३.०९.२०१८ रोजी केलेला होता. तथापि, धाराशिव साखर कारखान्याने दि. ०३.०९.२०१८ रोजीच्या भाडे करारातील अटी/ शर्तींचे पालन न केल्याने धाराशिव साखर कारखान्यास बँकेच्या वकीलामार्फत दि.१३.०७.२०२३ रोजी नीटीस बजाविण्यात आलेली होती. त्यानंतर झालेल्या निर्णयानुसार धाराशिव साखर कारखान्यास दि. ०७.१२.२०२३ रोजीच्या पत्रान्वये दि. १५.१२.२०२३ रोजी कारखाना मालमत्तेचा ताबा बँकेस देणे बाबत कळविण्यात आलेले होते. त्यास अनुसरुन धाराशिव साखर कारखान्याने दि. १५.१२.२०२३ रोजी कारखाना मालमत्तेचा ताबा बँकेकडे सुपूर्द करून तसे ताबा पत्र करण्यात आलेले आहे. सदर कारखान्याच्या सर्व मिळकती धाराशिव साखर कारखान्या कडून ताब्यात घेतलेनंतर कारखाना कार्य स्थळावर पंचनामा करण्यात आलेला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिखर बँकचे जनरल मॅनेजर आर. डी. अमोलकर, विनोद बागडे, नरेंद्र पाटील, अवसायक कार्यालयाचे कर्मचारी धामणे, नाना देवरे, बाळासाहेब पगार, सुरक्षा अधिकारी, बागूल, वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावकार, आनंदा देवरे, नंदू जाधव, विलास सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम