देवळा | उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची उपोषण मागे घेण्याची विनंती

0
19

देवळा | तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी देवळा तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी भेट देऊन पक्षाच्या आणि शासनाच्या वतीने उपोषण मागे घेण्याची विनंती उपोषणकर्त्यांना केली.

Chhagan Bhujbal | मराठा ओबीसीत फुट पाडण्याचा भुजबळांचा डाव..?
यावेळी उदयकुमार आहेर म्हणाले की, उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्या आणि त्यांच्या भावना अगदी योग्य आहेत. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात. मात्र, लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते आहे. देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या मी स्वतः शासन दरबारी मांडून उपोषणकर्त्यांसह संबंधित मंत्री तसेच मंत्रालयातील अधिकारी यांची भेट घेण्याची माझी तयारी आहे. मात्र, उपोषणकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीचा सारासार विचार करण्याची गरज आहे. दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय हा तालुका किंवा जिल्हा पातळीवर होणार नाही. त्यासाठी शासन दरबारी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहेत. म्हणून उपोषणकर्त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने उदयकुमार आहेर यांनी उपोषणकर्त्यांना केले.

मराठा आरक्षणासाठी २४ तासांत चौघांची आत्महत्या; मराठा आंदोलन आणखी तीव्र होणार?

यावेळी उपोषणकर्ते दिलीप पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब निकम, ज्येष्ठ नेते दिलीप आहेर, सौ. अरुणाताई खैरनार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत, बागलाण तालुका काँग्रेसचे नेते श्री. किशोर कदम यांनी उदयकुमार आहेर यांनी मांडलेल्या भूमिकेला सहमत असल्याचे सांगितले. याविषयी उद्या दुपारपर्यंत सन्मानजनक तोडगा निघून अन्नत्याग आंदोलन मागे घेतले जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here