Deola | जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.उप सभापती धर्मा पांडुरंग देवरे हे होते. प्रथमत: सकाळी उमराणे वतनाचे ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात येथील बाजार समितीचे उपसभापती प्रविण देवरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली.स्वराज्याचे भगव्या ध्वजाचे पूजन नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यात छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, एस. पी. एच. कन्या विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्हिजन इंग्लिश स्कूल यातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. यावेळी माध्यमिक शाळेचे लेझीम पथक, ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषेतील भगवी वस्त्रे, भगवे ध्वज हाती घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.
मिरवणुकीच्या शेवटी गजराजा वर बाल छत्रपती शिवाजीराजे यांचे वेशभूषा केलेले तरुण मिरवणुकीचे आकर्षक ठरले होते. मिरवणूक छत्रपती शिवाजीराजे चौकात येऊन या वेळी शिवराजमुद्रेचे पूजन रामेश्वर महादेव गोशाळेचे संचालक सुनील देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंती उत्सवाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम पंचायत सदस्य सचिन रामदास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी राजे यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार सोसायटीचे चेअरमन मोठाभाऊ देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. उमराणा वतनातील बारा बलुतेदार व अठरा पगड बहुजन समाजाच्या वतीने तसेच गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Deola | रासायनिक खतांसोबत लिंकेज खते घेण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत यश संपादन केलेले वृषाली राजेंद्र देवरे, आदित्य विकास जाधव, वैभव बळीराम देवरे, स्वप्नील मोतीराम देवरे, सुयेश गोरख देवरे, शिवमराजे रत्नाकर हिरे तसेच सार्थक रत्नाकर देवरे आयआयटी मधे निवड झाल्यामुळे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या हस्ते शिवकालीन पगडी परिधान करून शिवचरित्र भेट देऊन जाणता राजा मित्र मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सरपंच दिलीप देवरे, मोतीराम देवरे, बाळासाहेब देवरे, दत्त्तू देवरे, पंकज ओस्तवाल, सुनील देवरे, रत्नाकर देवरे, शिवाजी देवरे, मुख्याधापक पि.के.सूर्यवंशी, बस्ते सर, आर.वाय.कुवर, हिरे सर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी गेल्या ३१ वर्षाच्या कालखंडातील मंडळाच्या कार्याविषयीची माहिती विषद केली. यावेळी प्रशांत देवरे यांनी मंडळाने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या बाबतीत मंडळाचे आजवरचे कार्य पाहून, शिवरायांच्या शूर किल्लेदार व वीर मावळयांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असल्याचा विशेष उल्लेख केला. संदीप देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम