सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत देवळा नगरपंचायतीच्या वतीने एकल वापर प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येऊन देवळा शहरात जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ५ किलो प्लास्टिक नगरपंचायतीने विविध विक्रेत्यांकडून जप्त केले. ही मोहीम सुरु राहणार असून प्लास्टिक वितरण व वितरक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवळा मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिला आहे. एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून एकल वापर प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहीम राबविण्याच्या सुचना आल्या आहेत. प्रत्येक महिन्याला ही मोहीम राबविण्यात येणार असून, बुधवारी (दि.१८) रोजी देवळा नगरपंचायतीने सदर मोहीम राबविली.
Deola | माझी वसुंधरा अभियानात देवळा नगरपंचायतीचा प्रथम क्रमांक
यात शहरातील विक्रेते, फुलविक्रेते, स्थानिक बाजारपेठेत, भाजीपाला मंडई दुकाने या ठिकाणी जप्ती व बंदी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेतून ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच एकल वापर प्लास्टिक वापर न करण्याबाबत मार्गदर्शनपर दुकानदारांना सुचना देण्यात आल्या. ही मोहीम सुरु राहणार असून यापुढे प्लास्टिक वितरण व वितरक दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असून, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम देवळा शहरात राबविण्यात आली. या पथकात स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, स्थापत्य अभियंता आशिष महाजन, जुगल घुगे, लिपिक अनिल रायते, शरद पाटील, शहर समन्वयक दिग्विजय देवरे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम