सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील मेशी सह, महालपाटणे, खामखेडा आदी परिसरात उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज बुधवारी (दि. १९) रोजी देवळा येथे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. ना. कोकाटे यांनी सदर नुकसानीची (दि. २६) जानेवारी रोजी रात्री उशीरा ८ वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बॅटरीच्या उजेडात पाहणी केली. त्यांच्या समवेत आ. डॉ. राहुल आहेर होते. यावेळी ना. कोकाटे यांनी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांशी फोनवर सूचना दिल्या होत्या.
Deola | दोषी औषध कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार – कृषीमंत्री कोकाटे
दरम्यान, आज संबंधित शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाल्याने यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले. मेशी येथे शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टीसाईड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास शंभर एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला असून, कृषीमंत्री ना. कोकाटे व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून या नुकसानग्रस्त शेतकर्यांना प्रति एकरी ४० हजार रुपये प्रमाणे महाल पाटणे, मेशी व खामखेडा येथील ५५ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून दिली.
या रकमेचा आज बुधवार (दि. १९) रोजी शिवजयंतीच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश ना. कोकाटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सुनील आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राजेश कदम, प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय वाघ, कृषी अधिकारी नलिनी खैरनार, कृषी सहायक व्ही. आर व्हलगडे, एम. ए जाधव, डी. वाय भदाणे आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम