Deola | प्रदूषणमुक्त सण व उत्सव साजरे करा; मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर

0
42
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा नगरपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये सहभाग घेतला असून, त्या अंतर्गत “ग्रीन फेस्टिवल” हा उपक्रम राबविण्यात यावा असे आवाहन नगरपंचायतीला शासनाने केले असून, त्या अनुषंगाने देवळा शहर व उपनगरातील नागरिकांरी येणारे सन उत्सव भुमी, जल, वायू, ध्वनी प्रदूषणमुक्त साजरे करावे असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.

Deola | घरफोडीच्या घटनांनी मालेगाव हादरले; 68 हजार 400 रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन

तसेच नगरीकांनी जमा केलेला सुका, ओला व हानिकारक कचरा याचे वर्गीकृत करून नगरपंचायतीच्या कचरा संकलन घंटागाडीत देऊन शहर वासियांनी या अभियानात तथा सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले देवळा शहर स्वच्छ सुंदर, प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here