Deola | पिंपळगाव (वा.) जनता विद्यालयाच्या खेळाडूंची तालुका स्तरावर निवड

0
25
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत रामेश्वर येथे झालेल्या देवळा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये पिंपळगाव (वा.) येथील जनता विद्यालयातील 17 वर्षे गटातील मुलांच्या संघाने ललित थोरातच्या नेतृत्वाखाली 14 वर्षे गटातील मुलींच्या संघाने संघनायक प्रांजली भामरेच्या नेतृत्वाखाली बाजी मारली.

Deola | मुसळधार पावसाने मका, तूर, सोयाबीन बरोबर महागड्या कांदा बियाणाला फटका

खेळाडूंना शिक्षक पी. आर. निकम यांचे मार्गदर्शन

अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी विजेते पद प्राप्त केले. नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी दोन्ही संघांची निवड झाली आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी. आर. निकम यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेता संघाच्या यशाबद्दल म.वि.प्र.चे देवळा तालुका संचालक विजय पगार, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष दिलीप पाटील, माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष एन. डी. पाटील, प्राचार्या एस. एम. आहेर, पर्यवेक्षक बी. एस. निकम, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. भालेराव तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here