सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नाशिकच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बाळासाहेब गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल देवळा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. बाळासाहेब गुंजाळ हे मूळचे देवळा तालुक्यातील वाखारी येथील असून, व्यवसायानिमित्त ते गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकला स्थायिक झाले आहेत. अल्पावधीत गुंजाळ यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असून, सातपूर येथे औद्योगिक वसाहतीत त्यांनी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिले आहे.याची दखल घेऊन त्यांची नाशिकच्या गव्हर्निग कौन्सिल मेंबर पदासाठी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल गुंजाळ यांचा देवळा येथे सत्कार करण्यात आला.
Deola | देवळा तालुक्याच्या पूर्वभागात पुरपाणी सोडण्यासाठी सांगवी येथे आमरण उपोषण
आपण सर्वांनी मागील काही दिवसांपासून प्रचार प्रसार यंत्रणा राबविली, व मला संधी मिळाली यासाठी मी आपला व्यक्तिशः ऋणी असून, यासाठी आमचे नेते ललित गांधी यांची मुख्य भूमिका यातून ही निवडणुक बिनविरोध निवड शक्य झाल्याचे यावेळी गुंजाळ यांनी सांगितले. पुढेही आपले सहकार्य पाठबळ मिळत राहील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, माजी सभापती बापू देवरे, अनिल आहेर, दिलीप मेतकर, अनिल आहेर, अमोल आहेर, संतोष शिंदे, सतिश पाटील, सचिन सूर्यवंशी, समाधान आहेर, बी. के रौंदळ, सुभाष पगार, भावराव नवले, बाळासाहेब मगर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम