Deola | देवळा येथे गतिरोधकांवर झेब्रा क्रोसिंग नसल्याने होणाऱ्या आपघातांची शिवसेनेकडून दखल

0
56
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मालेगाव ते कळवण या मार्गावरील उमराणेपर्यंतच्या रस्त्यावर झेब्रा क्रोसिंग करण्यात यावेत या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देवळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. याबाबत माहिती अशी की, देवळा कळवण मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. ह्या मार्गावरून उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. या मार्गावरील वरवंडी गावानजीक तसेच इतर ठिकाणी टाकलेल्या गतिरोधकांवर झेब्रा क्रोसिंग नसल्याने येथे नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात.

Deola | देवळा येथील क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांना राष्ट्रीय योगवीर पुरस्कार जाहीर

त्याच प्रमाणे देवळा मालेगाव रस्त्यावरदेखील हाच प्रकार सतत घडत असल्याने याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तात्काळ झेब्रा क्रोसिंग करून वाहन धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, युवासेनेचे शहराध्यक्ष प्रतिक आहेर, शिवसेना शहर उपाध्यक्ष गणेश ढवळे, राकेश हेंबाडे, कल्पेश बोरसे, गौरव मेतकर आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here