सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | “योगी बनो, सहयोगी बनो, समाज के लिए उपयोगी बनो.” हे ब्रीद वाक्य असलेल्या अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, नवी दिल्ली तसेच भारतीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय योग वीर सन्मान पुरस्कार देवळा येथील क्रीडा शिक्षक सुनील देवरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा लवकरच श्री. राम ऑडिटोरियम अयोध्या (उ.प्र.) येथे केंद्रीय मंत्री, योगगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहे.
यात देवळा येथील सुनिल देवरे यांनी क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरिव योगदान दिले आहे. अर्थिक परिस्थिती गरीब पण बौद्धिक दृष्ट्या सक्षम खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षण व खेळाचा मार्ग सुकर करून दिला असून त्यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ अनेक संस्थेत होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.
Deola | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जगातिक पर्यावरण दिन साजरा
देवरे यांनी योग शिक्षकाची पदवी घेतल्यानंतर शासकीय, शालेय व सार्वजनिक ठिकाणी योगाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला. याची दखल घेत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, नवी दिल्ली या संस्थेने देवरे यांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड केली आहे.
देवरे यांचे आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा नेते केदा आहेर, अरुण पवार, प्राचार्य हितेंद्र आहेर, भाऊसाहेब पगार, योगेश आहेर, जितेंद्र आहेर, प्रमोद पाटील, गटशिक्षणाधिकारी सतिष बच्छाव, डॉ. वसंतराव आहेर, कौतिक पवार, एस.टी. पाटील आदींनी अभिनंदन केले.
Deola | ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात देवळ्यात असहकार आंदोलन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम