सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रोत्सवाला अक्षय तृतीयाच्या दिवशी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून देवळा परिसरासह तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शुक्रवारी (दि. १०) रोजी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता दुर्गा माता मंदिरात मांडव टाकून यात्रोत्सवाला सुरुवात झाली.
Deola | देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
सकाळी १० वाजता दुर्गा मातेच्या प्रतिमेची रथावरून मिरवणुकीद्वारे देवळा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. रथाच्यासोबत रामलीलाची वेशभूषा करून मिरवणूकीचे आकर्षण वाढवले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. तर देवळा नगरपंचायतीने मिरवणुकीत लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान जनजागृतीचे हातात फलक घेऊन मतदानाबाबत जनजागृतीही केली.
Deola | देवळा येथे मतदार जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम
तसेच दुपारी तीन वाजता भव्य टांगा शर्यद भरविण्यात आली. टांगा शर्यतीत देवळा परिसरासह इतर स्पर्धकांनीही सहभाग नोंदवला होता. सायंकाळी देवळा नदीपात्रात यात्रेनिमित्त बहुसंख्य पाळणे तसेच इतर खेळणीचे दुकाने थाटण्यात आल्याने लहान मुलांसह सर्वांनीच त्याचा आनंद लुटला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम