Deola | देवळा महाविद्यालयाचे उपप्राचार्य बापू रौंदळ यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार

0
60
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य बापू रौंदळ यांचा बुधवार (दि २४ )रोजी सेवापूर्ती समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते‌. याप्रसंगी संस्थेच्या सचिव प्रा. डॉ. मालती आहेर, ज्येष्ठ संचालक पि.टी पवार, प्रमुख अतिथी डॉ. एकनाथ पगार, देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, देवाजी अण्णा रौंदळ, उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रौंदळ यांच्या कार्याचा सर्व उपस्थितांनी गौरव केला.

रौंदळ यांनी आपल्या 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी यांच्याप्रति असलेली आस्था, विद्यार्थ्यांच्या भविष्याची कळकळ आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व असा उल्लेख सर्व मान्यवरांनी केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. जयवंत भदाणे यांनी केले आभार एन.वाय पाटील यांनी मानले.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, जगदीश पवार, प्रल्हाद भामरे, बाळासाहेब गुंजाळ, हिरामण गांगुर्डे, डॉ. वसंतराव आहेर, डॉ. विश्राम निकम,पंडितराव निकम, जितेंद्र आहेर, अतुल पवार, शाहू शिरसाट, जिभाऊ खैरनार, बाजीराव निकम, सतीश पाटील, दिलीप मेतकर, सुभाष पगार, संजय भामरे, गोविंद पगार, रवी वाघ आदींसह रौंदळ यांचे सर्व मित्र, आप्तेष्ट महाविद्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here